येत्या काही दिवसात भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. येत्या ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण या मालिकेपासून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला (२०२१-२०२३) सुरुवात होत आहे.
मात्र, या मालिकेपूर्वी सराव सामन्यादरम्यान भारतीय संघातील २ खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तो ही या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यांना पर्यायी खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु ते सुरुवातीच्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहेत. चला तर पाहूया कशी असू शकते, पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हेन.
पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघ रोहित शर्मा सह यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलला सलामी फलंदाजी करण्याची जबाबदारी देऊ शकतात. तर गेल्या काही महिन्यांपासून सतत फ्लॉप ठरलेल्या चेतेश्वर पुजारावर संघव्यवस्थापन या मालिकेत पुन्हा एकदा विश्वास ठेवतील, अशी शक्यता आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवू शकतात. तर मध्याक्रमात कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी असेल.(Probable playing 11 of Indian team for first test match against England)
या सामन्यात दोन यष्टिरक्षक फलंदाज खेळताना दिसून येऊ शकतात. केएल राहुलसह रिषभ पंतला ही या संघात स्थान दिले जाऊ शकते. रिषभ पंतने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विन या एकमेव गोलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. कारण विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एक आणखी वेगवान गोलंदाजाची कमतरता जाणवली होती.
तसेच वेगवान गोलंदाज म्हणून या सामन्यात ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांना स्थान दिले जाऊ शकते. याशिवाय मोहम्मद सिराज देखील बॅकअप गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो. इंग्लडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि गती मिळत असते. त्यामुळे भारतीय संघाला जर या मालिकेत विजय मिळवायचा असेल तर, फलंदाजांसह गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी करणे आवश्यक असणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा,विराट कोहली(कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
ऐतिहासिक! ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या एकमेव भारतीय घोडेस्वाराची अंतिम फेरीत
भारीच! ऑलिम्पिकमध्ये घडला इतिहास, खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत वाटून घेतले सुवर्णपदक
महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर होतोय कौतुकाचा वर्षाव, लोक म्हणाले, ‘हे खरेखुरे कबीर खान’