शुक्रवार (२५ सप्टेंबर) रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील ७वा सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळण्यात येईल. हा चेन्नई संघाचा या हंगामातील तिसरा तर दिल्ली संघाचा दूसरा सामना आहे. Probable Playing Xi Of CSK And DC
या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये थोडेफार बदल पाहायला मिळू शकतात. चेन्नई संघाकडून शेन वॉटसन आणि मुरली विजय सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरु शकतात. तर मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार एमएस धोनी यांच्या खांद्यावर असेल. तर रविंद्र जडेजा, पियूष चावला, सॅम करन, लुंगी एन्गिडी आणि दिपक चाहर हे गोलंदाजही चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असतील.
तर दिल्ली संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विन हा दुखापतग्रस्त असल्यामुळे संघातील अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल दिसू शकतात. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरतील. कर्णधार श्रेयस अय्यर, ऍलेक्स कॅरी, रिषभ पंत आणि मार्कस स्टोइनिस मधळ्या फळीत फलंदाजी करतील. शिवाय अक्षर पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, एन्रिच नोर्किए आणि मोहित शर्मा या गोलंदाजांचाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश असेल.
चेन्नई सुपर किंग्सचा संभावित ११ जणांचा संघ
शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, पियूष चावला, सॅम करन, लुंगी एन्डिगी आणि दिपक चाहर.
दिल्ली कॅपिटल्स संभावित ११ जणांचा संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍलेक्स कॅरी, रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कागिसो रबाडा, मोहित शर्मा आणि एनरिच नॉर्त्जे
महत्त्वाच्या बातम्या –
केएल राहुलचे २ झेल सोडलेला विराट झाला सोशल मीडियावर ट्रोल, व्हायरल होतायेत मीम्स
आरसीबी विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलची तुफान फटकेबाजी, ९ चेंडूत ठोकल्या तब्बल ४२ धावा
संघाने सामनाही गमावला आणि विराटने १२ लाखांचा दंड देखील भरला, कारण वाचा
ट्रेंडिंग लेख –
शतक एक विक्रम अनेक! जाणून घ्या केएल राहुलने केलेले ८ महत्त्वाचे विक्रम
सुपर ओव्हर टाकायचीये? पाहा प्रत्येक संघातील ‘अशा’ खास खेळाडूंची नावे
आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक