आज (२१ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) सामना रंगणार आहे. यातील पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुसरा सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
पहिला सामना
मागील सलग २ सामन्यात पराभूत झालेला पंजाब संघ हा सामना जिंकत हंगामातील दुसरा विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असेल. अशात दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनसह पंजाबचा संघ मैदानावर उतरु शकतो. केवळ रिले मेरेडिथला वगळून त्याच्या ख्रिस जॉर्डनला संधी दिली जाऊ शकते.
दुसरीकडे हंगामातील सलग ३ सामने गमावत बॅकफूटवर असलेला हैदराबाद संघ हा सामना जिंकत विजयाचे खाते उघडण्यासाठी झगडताना दिसेल. अशात हैदराबाद संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात काही प्रमुख बदल पाहायला मिळू शकतात. निराशादायी कामगिरी करणाऱ्या मनिष पांडे आणि विजय शंकर यांना बाकावर बसवत जेसन रॉय आणि केन विलियस्मनला संधी दिली जाऊ शकते. जर विलियम्सन दुखापतीमुळे या सामन्यातही अनुपलब्ध राहिला तर त्याच्याजागी केदार जाधवला आजमावले जाऊ शकते.
पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, डेविड मलान, दीपक हूडा, शाहरुख खान, जलज सक्सेना, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, झाय रिचर्डसन
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय, प्रियम गर्ग, विराट सिंह, केदार जाधव, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, शाहबाज नदीम, खलील अहमद
🚨 Double Header Alert 🚨
We are here to tell you again that you can now make separate transfers for the two matches. 😎
To make your team, visit 👇https://t.co/VAVN1B3Y4t pic.twitter.com/2cSXW9N0VC
— IPL Fantasy League (@IPLFantasy) April 21, 2021
दुसरा सामना
ऑएन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघ मागील सामन्यातील चुका सुधारत चेन्नईला चितपट करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. अशात अंतिम ११ जणांमध्ये अनुभवी फिरकीपटू सुनिल नरेनला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे विजयरथावर स्वार असलेला चेन्नई संघ प्लेइंग इलेव्हन केवळ एका बदलासह मैदानावर उतरु शकतो. सुरुवातीच्या तिनही सामन्यात फ्लॉप ठरलेला युवा सलीमीवीर ऋतुराज गायकवाडला वगळत त्याच्याजागी अनुभवी रॉबिन उथप्पाला स्थान दिले जाऊ शकते.
कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेवन
शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, ऑएन मोर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन/ सुनील नरेन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिंस, वरुण चक्रवर्ती, हरभजन सिंह/शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेवन
फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, सॅम करन, ड्वेन ब्रावो आणि दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
सेहवागने पाहिजे ते माग म्हटले असता मिश्रा म्हणाला होता, ‘फक्त माझी पगार वाढवा’; वाचा तो किस्सा
“जेव्हाही हार्दिक पंड्या मैदानावर येतो, तेव्हा-तेव्हा मी त्याला बाद करतो”
रविंद्र जडेजाच्या जिवलग ‘वीर’चे झाले निधन, भावनिक पोस्ट शेअर करत दिला निरोप