---Advertisement---

IPL आजचा सामना : हंगामातील दुस-या विजयासाठी पंजाब आणि राजस्थानमध्ये होणार लढत, पाहा संभाव्य संघ

---Advertisement---

रविवारी शारजाह येथे आयपीएलच्या तेराव्या हंगामातील नववा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे. पंजाब संघाचा हा तिसरा तर राजस्थान संघाचा हा दूसराच सामना असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल. Probable Playing Xi Of Rajasthan Royals And Kings Xi Punjab

इंग्लंडचा धुरंधर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरच्या आगमनामुळे राजस्थान संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात.  पंजाबविरुद्धच्या सामन्यात युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि बटलर सलमीला फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, डेविड मिलर आणि रियान पराग हे मधळ्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

तसेच या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज टॉम करनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले जाऊ शकते. तर राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल आणि कार्तिक त्यागी हे गोलंदाज राजस्थानच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असतील.

तर दूसरीकडे पंजाब संघात कदाचित काहीही बदल पाहायला मिळू शकत नाहीत. पंजाबकडून आजच्या सामन्यातही कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी येतील. तर करुण नायर, सर्फराज खान, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल आणि जेम्स नीशम हे मधळ्या फळीत फलंदाजी करताना दिसतील.

शिवाय रवि बिश्नोई, मुरगन अश्विन, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल हे पंजाबच्या गोलंदाजीची कमान सांभाळतील.

राजस्थान रॉयल्सची संभावित प्लेइंग इलेव्हन 

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल आणि कार्तिक त्यागी.

किंग्स इलेव्हन पंजाबची संभावित प्लेइंग इलेव्हन 

मयंक अगरवाल, केएल राहुल (कर्णधार), करुण नायर, सर्फराज खान, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स नीशम, रवि बिश्नोई, मुरगन अश्विन, मोहम्मद शमी आणि शेल्डन कॉट्रेल.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-दिनेश कार्तिकने कोलकाताच्या विजयाचे श्रेय दिले ‘या’ खेळाडूला

-पंजाबविरुद्ध खेळताना ‘या’ खेळाडूची विकेट घेणे सर्वात महत्त्वाचे, दिग्गजाने सांगितले नाव

-धोनीला मागे टाकत एलिसा हेलीने पटकावला अव्वल क्रमांक, पाहा कोणता केलाय विश्वविक्रम

ट्रेंडिंग लेख-

-स्टार खेळाडूंचा होता भरणा, तरीही ‘या’ ५ कारणांमुळे हैदराबाद झाली चारीमुंड्या चीत

–आयपीएलमध्ये ‘या’ संघांनी केल्यात सर्वाधिक वेळा २०० धावा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १६- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---