इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा नववा सामना आज (१७ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केल्याने रोहितच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे हा सामना जिंकत आपली विजयी लय कायम राखण्याचा मुंबईचा मानस असेल. तर हंगामातील सुरुवातीचे सलग २ सामने गमावलेला हैदराबाद संघ विजयाची आशा उरी बाळगून मैदानात उतरेल. अशात दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, हा प्रश्न सर्वांना सतावत असेल.
हंगामातील पहिले दोन्ही सामने चेन्नईच्या मैदानावर खेळताना हैदराबादच्या पदरी निराशा आली आहे. या सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु फलंदाजांना हवे तसे प्रदर्शन करता आला नाही. त्यातही त्यांचा मधल्या फळीतील धाकड फलंदाज केन विलियम्सन दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्याला बरे होण्यासाठी अजून एका आठवड्याचा तरी कालावधी लागेल. त्यामुळे मागील २ सामन्यांप्रमाणे या सामन्यातही वॉर्नरसेना विलियम्सनविना मैदानात उतरेल. याबरोबरच मनिष पांडे आणि वृद्धिमान साहा यांना डच्चू दे इतर खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
मुंबई संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांच्या अंतिम ११ जणांच्या पथकात बदल होण्याची शक्यता फार कमी आहे. नवोदित शिलेदार मार्को जेन्सन याच्याजागी नाथन कूल्टर नाइलला संधी दिली जाऊ शकते. उर्वरित संघ मागील सामन्याप्रमाणे असेल.
सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, प्रियम गर्ग, केदार जाधव, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, राशिद खान, टी नटराजन, शाहबाज नदीम
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, नाथन कूल्टर नाइल/मार्को जेन्सन
महत्त्वाच्या बातम्या-
ओळखलंत का? रियान परागचे ‘हे’ छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिली मजेदार नावे
सामना गमावला तरीही ‘पावर हिटर’ शाहरुखने जिंकले प्रिती झिंटाचे मन, ट्विट करत म्हणाली…
‘हा तर सरळ सरळ जडेजाचा अपमान’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची बीसीसीआयवर आगपाखड