श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० क्रिकेटचा एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपली विशिष्ट गोलंदाजीची शैली आणि वैविध्यपूर्ण केशरचना यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. काही दिवसांपासून त्याच्या कुरळ्या केसांचा एक मीम सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. या ट्रेंडमध्ये सहभागी होत राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून अष्टपैलू रियान परागचा मलिंगासारख्या केशरचनेचे फोटोशॉप केलेले छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. ज्यावर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.
राजस्थान रॉयल्सने शेअर केलेले छायाचित्र
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयानंतर राजस्थान रॉयल्सच्या इंस्टाग्राम खात्यावरून एक मीम शेअर करण्यात आला आहे. या मीममध्ये राजस्थानचा युवा अष्टपैलू रियान परागचे लसिथ मलिंगाच्या कुरळ्या केसांप्रमाणे फोटोशॉप केलेले छायाचित्र आहे. सोबतच्या छायाचित्राला कॅप्शन देताना, ‘मुंबई इंडियन्सचे चाहते याला फोटोशॉप म्हणतील.’ अल्पावधीतच हे छायाचित्र अनेकांकडून पसंत केले गेले.
.@mipaltan fans will say this is photoshopped. ????#HallaBol | #RoyalsFamily | @ParagRiyan pic.twitter.com/b3bEnYzrG0
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 16, 2021
चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया
अगदी कमी कालावधीत हे छायाचित्र व्हायरल झाले. त्यानंतर या छायाचित्रावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले रियान परागचे नामकरण रिसथ परिंगा केले. तर, दुसऱ्या एका चाहत्याने रियानलिंगा म्हटले.
https://twitter.com/PhenomenalAJ69/status/1382979876924248068
Riyasith Paringa ????
— sanat pandey (@sanatpandey) April 16, 2021
Malinga got a competitor ????
— ????????????????????????⚔ (@iamsohail_1) April 16, 2021
No wonder he bowls this way ✌️ pic.twitter.com/HblTkdWr7z
— `R (@ryandesa_7) April 16, 2021
Even Riyan Parag will say this is photoshopped
— School Boy (@Control_toni) April 16, 2021
रियान हा १९ वर्षीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामचे तर, आयपीएलमध्ये मागील तीन वर्षापासून राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सलग दोन सामने त्याने गोलंदाजी करताना मलिंगासारख्या टाकलेल्या दोन चेंडूंमूळे तो सोशल मीडियावर ट्रेंड होत होता.
That is right-arm perpendicular. What name can you think of for this unique action? #RRvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/lTYuL6Xl4r
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
मलिंगाची केशरचना आहे ट्रेंडींगला
आयपीएलमध्ये केवळ मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या लसिथ मलिंगाने मुंबईच्या चार विजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या काही दिवसांपासून मलिंगासारखी केशरचना करून काही खेळाडूंची फोटोशॉप केलेली छायाचित्रे व्हायरल केली जात आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी तसेच, श्रीलंकेचा माजी कर्णधार व सध्या राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या कुमार संगकारा या खेळाडूंचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
सामना गमावला तरीही ‘पावर हिटर’ शाहरुखने जिंकले प्रिती झिंटाचे मन, ट्विट करत म्हणाली…
‘हा तर सरळ सरळ जडेजाचा अपमान’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराची बीसीसीआयवर आगपाखड
धोनी म्हणजे चेन्नई सुपर किंग्जच्या ‘काळजाचा ठोका’; प्रशिक्षकाने केलं तोंडभरुन कौतुक