संपुर्ण नाव- अभिमन्यू मिथुन
जन्मतारिख- 25 ऑक्टोबर, 1989
जन्मस्थळ- बेंगलोर
मुख्य संघ- भारत, भारत अ, कर्नाटक, कर्नाटक एकादश, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दक्षिण विभाग आणि सनराइजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 18 ते 22 जुलै, 2010, ठिकाण – गॅले
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 27 फेब्रुवारी, 2010, ठिकाण – अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 120, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 4/105
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 51, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/32
थोडक्यात माहिती-
-अभिमन्यू मिथुन हा उंच, फिट खेळाडू आहे, ज्याच्यात वेगवान गोलंदाज बनण्याचे सर्व गुण आहेत.
-वयाच्या 20व्या वर्षी मिथुनने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी कर्नाटककडून खेळताना त्याने 2009-10च्या संपूर्ण हंगामात 52 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच 10 वर्षांपासून पहिल्यांदाच कर्नाटकला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
-2010मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी आणि श्रीलंकाविरुद्ध वनडेत पदार्पण केले.
-कसोटीत 4 सामने खेळत त्याने 120 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या होत्या. तर, वनडेत 5 सामने खेळत 51 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-2013-14 मध्ये 41 विकेट्स आणि 2014-15मध्ये 39 विकेट्स अशी त्याची रणजी ट्रॉफीतील कामगिरी होती.
-मिथुन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून त्याने सुरुवात केली होती. पुढे, 2015मध्ये तो मुंबई इंडियन्स आणि 2016मध्ये सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग होता.
-2015मध्ये मिथुनने तमिळ अभिनेत्री राधिका सार्थकुमार यांची मिलगी रायनाशी लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे.