---Advertisement---

मराठीत माहिती – क्रिकेटर अजित वाडेकर

---Advertisement---

संपुर्ण नाव- अजित लक्ष्मण वाडेकर

जन्मतारिख- 1 एप्रिल, 1941

जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र

मृत्यू- 15 ऑगस्ट, 2018

मुख्य संघ- भारत आणि मुंबई

फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर, 1966

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 37, धावा- 2113, शतके- 1

आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 2, धावा- 73, शतके- 0

थोडक्यात माहिती- 

-वाडेकर यांनी 1968मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेलिंग्टन येथे सर्वाधिक 143 धावा केल्या होत्या. हे शतक वाडेकरांच्या 37 सामन्यांमध्ये केलेले एकमेव शतक होते. या सामन्यात इतर कोणत्याही फलंदाजाला 50हून अधिक धावा करता आल्या नव्हत्या.

-तसेच भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकत 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. यासह अखेरच्या कसोटी सामन्यात आणखी एक मोठा विजय मिळवून संघाने आपला पहिला कसोटी मालिका विजय नोंदविला होता.

-वाडेकर हे 1970साली स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी होते. त्यांच्यावेळी जी व्यक्ती त्यांच्याकडून बँकेत खाते काढत होती, त्या व्यक्तीला वाडेकर यांची सही असलेली ‘मिनी बॅट’ दिली जात होती. वाडेकर यांची बहीण सविता यांनी बँकेत खाते काढल्यानंतर त्यांना सचिन तेंडूलकर यांची सही असलेली बॅट मिळाली होती.

-कर्णधार म्हणून सर्वाधिक रणजी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम वाडेकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1968/69, 1969/70, 1970/71 आणि 1971/72 या वर्षात कर्णधार म्हणून मुंबई संघाला विजय मिळवून दिला होता.

– वाडेकर यांचा खेळाडू म्हणून 11 वेळा रणजीच्या अंतिम सामन्यात सहभाग होता. अशोक मंकड यांच्यानंतर एवढ्या रणजी अंतिम सामन्यात सहभागी असणारे ते दुसरेच मुंबईकर क्रिकेटपटू होते. अशोक हे 12 वेळा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सहभागी होते.

-वाडेकर हे भारतीय वनडे संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी 13 जुलै 1974मध्ये लिड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. त्यानंतर अवघ्या एका वनडे सामन्यात ते संघाचे कर्णधार होते. हा सामना 15 जुलै रोजी ओव्हल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध  झाला होता. दुर्दैवाने या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले.

-वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा परदेशात कसोटी विजय मिळवला होता. 1971मध्ये भारताने इंग्लंड (1-0) आणि विंडीज (1-0) या देशात कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आजपर्यंत इंग्लंडमध्ये केवळ 3 कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

-सुनिल गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, एस वेंगकटराघवन आणि बिशनसिंग बेदींसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधार अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

-क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वाडेकर यांनी अनेक क्षेत्रात काम केले आहे. ते सप्टेंबर 1992 ते मार्च 1996मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. ऑक्टोबर 1998 ते सप्टेंबर 1999च्या काळात निवड समितीचे अध्यक्षही होते.

-लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांच्यानंतर वाडेकर हे एकमेव असे क्रिकेटपटू होते जे संघाचे कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षही होते.

-वयाच्या 77व्या वर्षी वाडेकर यांचा मृत्यू झाला. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 71व्या स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट 2018) त्यांचे निधन झाले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---