---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर अरूण लाल

---Advertisement---

संपुर्ण नाव- जगदीशलाल अरूण लाल

जन्मतारिख- 1 ऑगस्ट, 1955

जन्मस्थळ- मोरदाबाद, उत्तर प्रदेश

मुख्य संघ- भारत, बंगाल आणि दिल्ली

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 17 ते 22 सप्टेंबर, 1982, ठिकाण – चेन्नई

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 27 जानेवारी, 1982, ठिकाण – कटक

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 16, धावा- 729, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी- 93 धावा

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 13, धावा- 122, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 51 धावा

थोडक्यात माहिती-

-अरूण लाल यांना त्यांचे जवळचे मित्र पिगी या नावाने बोलवत असत.

-ते मुळात एका क्रिकेटता वारसा असणाऱ्या कुंटुंबात जन्माला आले होते. त्यांचे वडील धीर जगदीश लाल हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज होते. त्यांचे काका धीर मुनी लाल आणि आकाश लाल हेदेखील सलामीवीर फलंदाज होते.

– अरूण यांच्या वडीलांनी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अरूण हे दिल्ली संघाचे त्याकाळातील दमदार फलंदाज होते. त्यांची प्रथम श्रेणीतील कामगिरीही चांगली होती.

-अरूण हे अजमेर येथील मायो कॉलेजचे विद्यार्थी होते. तसेच, ते दिल्लीतील एसटी स्टीफन कॉलेजचेही माजी विद्यार्थी होते.

-20 वर्षाहून जास्त काळ अरूण यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यांनी त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 10421 धावा केल्या होत्या. याप्रमाणेच त्यांची रणजी ट्रॉफी कारकिर्दही उल्लेखनीय होती. त्यांनी रणजी ट्रॉफीत 93 सामन्यात 6762 धावा केल्या होत्या.

-अरूण यांनी रणजी ट्रॉफीत 3 आणि दुलिप ट्रॉफीत 2 द्विशतके ठोकली होती. शिवाय एकदा 1986साली पश्चिम विभागाविरुद्ध आणि 3 महिन्यानंतर 1987मध्ये राजस्थानविरुद्ध अशा 2वेळा त्यांची त्रिशतक करण्याची संधी हुकली होती. दोन्ही वेळेला ते 287 धावांवर बाद झाले होते.

-12 नोव्हेंबर, 1988साली बंगलोर येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत गोलंदाज रिचर्ड हेडली यांनी अरूण यांनी विकेट घेत, त्यांचा कसोटीतील सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम पूर्ण केला होता. अरूण यांची विकेट ही त्यांची 374वी विकेट होती. हेडलीपुर्वी असा विक्रम लॅन बॉथम यांनी केला होता.

-अरूण हे कोलकाता येथे सर्वोत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी चालवतात. त्यांच्या एकॅडमीचे नाव बोर्नविटा क्रिकेट अकॅडमी आहे.

-अरूण हे प्रसिद्ध समालोचकही होते. तसेच ते वृत्तपत्रात क्रिकेटशी संबंधित लेखही लिहित होते.

-अरूण यांनी दुरदर्शनवरील प्रसिद्ध व्हिडिओ गाणे मिले सूर मेरा तुम्हारा यातही काम केले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---