संपुर्ण नाव- अशोक भिमचंद्र दिंडा
जन्मतारिख- 25 मार्च, 1984
जन्मस्थळ- मेदिनीपूर, कलकत्ता (आताचे कोलकात)
मुख्य संघ- भारत, बंगाल, दिल्ली डेअरडेविल्स, पुर्व विभाग, भारत अ, कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती-वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 28 मे, 2010, ठिकाण – बुलवायो
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका , तारिख – 9 डिसेंबर, 2009, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 13, धावा- 21, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 13, विकेट्स- 12, सर्वोत्तम कामगिरी- 2/44
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 22, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 17, सर्वोत्तम कामगिरी- 4/19
थोडक्यात माहिती-
-पारस महामंब्रे, बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षक यांच्यामुळे अशोक दिंडा याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तसेच राष्ट्रीय संघातील त्याच्या निवडीच्या संधीही वाढल्या.
-2004-05मध्ये दिंडा त्याच्या गावापासून 3 तासाचा प्रवास करून कोलकाताला गेला. तिथे त्याला अटल देव बुर्मन यांनी दिंडाची गोलंदाजी तपासली. त्याच्या गोलंदाजी शैलीला प्रभावित होऊन त्यांनी पुढे दिंडाला गोलंदाजीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
-लवकरच दिंडा बंगाल रणजी ट्रॉफी संघाचा कायमचा सदस्य बनला. त्यावेळी त्याचा गोलंदाजी वेग 130 किमी दर तास होता.
-2008साली दिंडा सौरव गांगुलीच्या कोलकात नाईट रायडर्सचा भाग होता. आयपीएलचा दुसरा हंगाम केकेआरसाठी चांगला गेला नव्हता, त्यावेळी प्रशिक्षक जॉन बचनान यांनी गांगुलीकडून त्याचे संघाचे कर्णारपद काढून घेतले. पुढे 2012मध्ये दिंडा पुणे वॉरियर्स संघात सामाविष्ट झाला.
-2009मध्ये श्रीलंकाविरुद्ध दिंडाला टी20त पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने सनथ जयसुर्या याची पहिली विकेट घेतली.
-तर, पुढील वर्षी 2010मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या आशिया चषकातून त्याने वनडेतही पदार्पण केले होते.
-दिंडाने पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध 2013मध्ये 2 वनडे सामने खेळले. त्याच्या वेगवान यार्कर टाकण्याच्या शैलीने त्याला 2014मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने विकत घेतले.
-प्रथम श्रेणीत दिंडाच्या नावावर 116 सामन्यात 420 विकेट्स आणि अ दर्जाच्या 98 सामन्यात 151 विकेट्स आहेत.