संपुर्ण नाव- अशोक ओमप्रकाश मल्होत्रा
जन्मतारिख- 26 जानेवारी, 1957
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, बंगाल आणि हरियाणा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 ते 18 जानेवारी, 1982, ठिकाण – चेन्नई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख -27 जानेवारी, 1982, ठिकाण – कटक
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 226, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – नाबाद 72 धावा
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 20, धावा- 457, शतके- 0, सर्वोत्तम कामगिकी – 65 धावा
गोलंदाजी- सामने- 20, विकेट्स- 0
थोडक्यात माहिती-
-अशोक मल्होत्रा यांनी 27 आंतरराष्ट्रीय सामन्यात (20 वनडे आणि 7 कसोटी) फक्त वेस्ट इंडिजविरुद्ध 2 अर्धशतके ठोकली आहेत.
-मल्होत्रा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीत जरी विक्रम नोंदवले नसतील तरी त्यांनी गोलंदाजीत एक खास विक्रम केला होता. त्यांच्या पूर्ण वनडे कारकिर्दीत त्यांनी शून्य इकोनॉमी रेटसह केवळ षटक गोलंदाजी केली होती. त्यामुळे ते शून्य इकोनॉमी रेटने केवळ 1 षटक गोलंदाजी करणारे वनडोतील दुसरेच गोलंदाज ठरले होते. त्यांच्यापुर्वी असा विक्रम न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नर यांनी केला होता.
-रणजी कारकिर्दीत मात्र मल्होत्रा यांचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बराच काळ कायम होता.
-ते पंजाबमध्ये जन्माला आले असले तरी त्यांनी हरियाणा आणि बंगालकडून मिळून 156 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यात त्यांनी 50.95च्या सरासरीने 9784 धावा केल्या होत्या.
-मल्होत्रा हे समालोचक तसेच राष्ट्रीय निवडकर्तेही होते. आता ते प्रतिष्टित प्रशिक्षक आहेत.
-मल्होत्रांनी जॉन राईटनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती.