---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर भारत रेड्डी

---Advertisement---

संपुर्ण नाव- भारत रेड्डी

जन्मतारिख- 12 नोव्हेंबर, 1954

जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)

मुख्य संघ- भारत, आणि तमिळनाडू

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षण

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 12 ते 16 जुलै, 1979

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 3 नोव्हेंबर, 1978

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 4, धावा- 38, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 3, धावा- 11, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-रेड्डी यांनी शालेय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली होती. 1973मध्ये त्यांनी इंग्लंड शालेय संघाविरुद्ध भारतीय शालेय संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळेला 1950 ते 60पर्यंत भारताचे फलंदाज असणारे विजय मांजरेकर हे भारतीय शालेय संघाचे व्यवस्थापक होते. रेड्डी यांच्या खेळीने ते खूप प्रभावित झाले होते.

-रेड्डी यांनी नोव्हेंबर 1973मध्ये बॉम्बेविरुद्ध भारतीय शेष संघाकडून खेळताना इराणी ट्रॉफीत पदार्पण केले होते.

-त्यांची इराणी ट्रॉफीतील कामगिरी पाहून निवडकर्त्यांनी त्यांना दुलिप ट्रॉफीत सलामीला खेळण्याची संधी दिली. तर, तमिळनाडूच्या निवडकर्त्यांनी त्यांना रणजी ट्रॉफीत खेळण्याची संधी दिली.

-1982-83मध्ये पलक्कड येथे केरळविरुद्ध खेळताना रेड्डी यांनी दुसऱ्या डावात यष्टीमागे 6 झेल झेलले आणि तमिळनाडू संघाच्या नावावर नवा विक्रम नोंदवला. तर, संपूर्ण सामन्यात यष्टीमागे 8 विकेट्स घेऊनही त्यांनी एका सामन्यात यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या या विक्रमाची नंतर रुबेन पॉल यांनी बरोबरी केली.

-देशांतर्गत क्रिकेट खेळताना सुरुवातीलाच रेड्डी यांना भारताचे नामांकित फिरकीपटू गोलंदाज श्रीनिवास वेंकटराघवन, व्हीव्ही कुमार, प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर यांच्यासोबत खेळण्याचे भाग्य लाभले.

-जुलै 1969मध्ये सय्यद किरमानी यांच्या ऐवजी भारत रेड्डी यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी झालेल्या 4 सामन्याच्या कसोटी मालिकेत त्यांनी इंग्लंडमध्ये एक नवा विक्रम नोंदवला होता. संपूर्ण मालिकेत त्यांनी यष्टीमागे 11 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. यात त्यांनी 9 वेळा फलंदाजाला झेलबाद आणि 2 वेळा फलंदाजाला यष्टीचीत केले होते. त्यांच्यानंतर किरण मोरे आणि एमएस धोनी यांनी त्यांचा विक्रम मोडला.

-कसोटीनंतर रेड्डी यांनी किरमानी यांच्या अनुपस्थित भारतीय संघाकडून 3 वनडे सामनेही खेळले होते. यामध्ये 1978-79मध्ये पाकिस्तानविरुद्धची त्यांचा पदार्पणाची वनडे सामना आणि 1980-81मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा वनडे सामना यांचा यात समावेश होता.

-रेड्डी यांची मुलगी श्रेया ही ऍंकर आणि व्हिडिओ जॉकी आहे. तिने अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिच्या कारकिर्दीत प्रियदर्शन कांचिवरम हा तमिळ चित्रपट महत्त्वाचा ठरला. कारण या चित्रपटासाठी 2010 साली तिला तमिळ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---