---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर चेतेश्वर पुजारा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 9, 2020 9:46 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- चेतेश्वर अरविंद पुजारा

जन्मतारिख- 25 जानेवारी, 1988

जन्मस्थळ- राजकोट, गुजरात

मुख्य संघ- भारत, डर्बिशायर, भारत अ, इंडिया ग्रीन, 19 वर्षांखालील भारतीय संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, नॉटिंघमशायर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सौराष्ट्र, 16 वर्षांखालील सौराष्ट्र संघ, 19 वर्षांखालील सौराष्ट्र संघ आणि यॉर्कशायर

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 9 ते 13 ऑक्टोबर, 2010, ठिकाण – बेंगलोर

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 1 ऑगस्ट, 2013, ठिकाण – बुलवायो

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 77, धावा- 5840, शतके- 18

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 5, धावा- 51, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद यांनी 1970च्या दशकात सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्त्व केले. त्याचे काका बिपिन यांनीही सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.

-पुजाराच्या वडिलांनी त्याच्यातील क्रिकेट कौशल्य एका फोटोवरून ओळखले होते. पुजाराने अडीच वर्षांचा असताना त्याच्या चुलत भावासोबत फलंदाजी करताना फोटो काढला होता. त्या फोटोतील पुजाराच्या बॅटबरोबरच्या संतुलनाने त्याच्या वडिलांनी त्याच्यातील क्रिकेट कौशल्याला हेरले होते.

-पुजारा सुरुवातीला अष्टपैलू क्रिकेटपटू होता. परंतु, भारताचे माजी क्रिकेटपटू कारसन घावरी यांनी पुजाराच्या वडिलांनी त्याला फलंदाजीवर अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.

-12वर्षांचा असताना पुजाराने 14 वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून नाबाद 306 धावांची खेळी केली होती. त्याने हे त्रिशतक 14 वर्षांखालील बडोदा संघाविरुद्ध केले होते.

-पुजाराने 14 वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून पहिले त्रिशतक ठोकले होते. तर, 2008मध्ये 22 वर्षांखालील सौराष्ट्र संघाकडून त्याने 2 सलग त्रिशतके केली होती. अशी एकूण 3 त्रिशतके त्याच्या नावावर आहेत.

-पुजारा 17 वर्षांचा असताना त्याची आई रीना यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर काही महिन्यांनी पुजाराने 2006ला श्रीलंकामध्ये आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक खेळला होता.

-अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पुजाराची फलंदाजी सरासरी ही ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मायकल बेवननंतर सर्वोत्कृष्ठ फलंदाजी सरासरी आहे. बेवन 57.86च्या फलंदाजी सरासरीने यादीत अव्वल स्थानी होता. तर, पुजारा 54.12 च्या फलंदाजी सरासरीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

-2017मध्ये पुजाराने प्रथम श्रेणीतील त्याचे 9वे द्विशतक ठोकले होते. सर डॉन ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणीत सरासरी 9 डावांनंतर एक द्विशतक नोंदवले होते. त्यांच्यानंतर प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतक करण्यात पुजाराचा क्रमांक येतो.

-मार्च 2013मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत द्विशतक ठोकत पुजाराने कसोटीतील त्याच्या 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. यासह 12 कसोटीत 1000 धावा पूर्ण करत तो सर्वात जलद 100 कसोटी धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय ठरला.

-2013मध्ये पुजाराला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार मिळाला होता.

-पुजाराने पहिले 3 हंगाम कोलकाता नाईट रायडर्सकडून घालवले. पुढे 2013मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला कमी सामने खेळायला मिळाले. 2014मध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सहभागी झाला.

-2014-15मध्ये पुजाराने डर्बिशायरकडून खेळताना सुरीविरुद्ध 90 धावा केल्या होत्या. तसेच त्याने लिसेस्रशायरकडून शतकी खेळी करून त्यांना सामना जिंकून देण्यात मदत केली होती. तर 2015मध्ये त्याने यॉर्कशायरसोबत हातमिळवणी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---