संपुर्ण नाव- अजित भालचंद्र आगरकर
जन्मतारिख- 4 डिसेंबर, 1977
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मिडलसेक्स, मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 7 ते 10 ऑक्टोबर, 1998
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 1 एप्रिल, 1998
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 26, धावा- 571, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 26, विकेट्स- 58, सर्वोत्तम कामगिरी- 6/41
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 191, धावा- 1269, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 191, विकेट्स- 288, सर्वोत्तम कामगिरी- 6/42
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 15, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/10
थोडक्यात माहिती-
-अजित आगरकर याने शारदाश्रम विद्यामंदीर विद्यालय या क्रिकेटसाठीच्या प्रसिद्ध विद्यालयात शिक्षण घेतले.
-प्रविण आम्रे, सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी अशा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्याकडून त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते.
-अजितचे वडील बालचंद्र यांच्या इच्छेखातीर त्याने क्रिकेटची सुरुवात फलंजादीने केली. मात्र, पुढे तो चांगला गोलंदाजही बनला. विद्यालयीन क्रिकेटमध्ये त्याने जाईल्स शिल्ड स्पर्धेत वयाच्या १५ व्या वर्षी त्रिशतक ठोकत आपले कौशल्याही दाखवून दिले होते.
-1994मध्ये अजितने 17 वर्षांखालील भारतीय संघ विरुद्ध 17 वर्षांखालील इंग्लंड संघातील सामना खेळला होता. यावेळी त्याने शिव सुंदर दास, अँड्र्यू फ्लिनटॉफ, ऍलेक्स टूडर यांच्यप्रमाणे सातत्याने 5व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
-1997मध्ये 19 वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना अजितने शतकी कामगिरी केली होती.
-1998मध्ये वनडेत पदार्पण करणाऱ्या अजितने अवघ्या 23 सामन्यात 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. वनडेत सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला. पुढे 2008मध्ये श्रीलंकाच्या अजंता मेंडीसने 19 सामन्यात 50 विकेट्स घेत त्याचा हा विक्रम मोडला.
-शिवाय वनडेत जलद 250 विकेट्स घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 163 वनडे सामन्यात त्यांनी 250 विकेट्स घेतल्या होत्या.
-1999-2000च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने सलग 5 वळा शून्य धावा केल्या होत्या. पुढे 2001मध्येही मुंबईत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्याला 2 वेळा शून्यावर बाद केले होते. अशा प्रकारे ते 7वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाले होते. त्यामुळे त्यांना बॉम्बे डक असे नाव पडले.
-राजकोटमधील 2000सालच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात 21 चेंडूत अर्धशतक करत अजितने विक्रम नोंदवला होता. त्याच्यापुर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध 1983मध्ये कपिल देवने सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता.
-कसोटीत अजितने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव शतक केले होते. हे शतक त्याने 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत केले होते. यानेतर 9 वर्षांनी राहूल द्रविडने हा विक्रम मोडला.
-ऍडलेड ओव्हल येथे 2003मध्ये 6/41 अशी कामगिरी करत 20 वर्षांनंतर अजितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत भारताला विजय मिळवून दिला होता.
-2010च्या रणजी ट्रॉफीत कर्नाटकच्या 6 फलंदाजांना बाद करत अजितने मुंबईला रणजी ट्रॉफी विजय मिळवून दिला होता.
-तर, 2012-13च्या हंगामात मुंबईचे नेतृत्त्व करत संघाला 40वे रणजी ट्रॉफी चषक मिळवून देण्याची कामगिरी अजितने पार पाडली होती. त्यापुढील हंगामात अजितने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेस्सीने रचला इतिहास! सामना संपण्यास 1 मिनिट असताना मार्टिनेझच्या भन्नाट सेव्हने अर्जेंटिना सुपर 8मध्ये
पेलेंसाठी प्रार्थना करा! फुटबॉल सम्राटाची प्रकृती खालावली; उपचारांना देत नाही प्रतिसाद