संपुर्ण नाव- धवल सुनिल कुलकर्णी
जन्मतारिख- 10 डिसेंबर, 1988
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, एअर एंडिया रेड, गुजरात लायन्स, भारत अ, भारत ब, भारत क, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई, मुंबई क्रिकेट असोसिएशन एकादश, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, वेलिंग्टन आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 2 सप्टेंबर, 2014, ठिकाण – बर्मिंगहम
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 20 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 27, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 19, सर्वोत्तम कामगिरी- 4/34
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/23
थोडक्यात माहिती-
-मुंबईकर धवल कुलकर्णी 17 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत मुंबईकडून खेळणारा पहिल्यांदा प्रसिद्धीला आला.
-कुलकर्णी 2009च्या रणजी ट्रॉफी हंगामात संपूर्ण हंगामात 22.02च्या सरासरीने 49 विकेट्स घेत मुंबई संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा क्रिकेटपटू ठरला.
-2008मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होत, कुलक्रणीच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. यावेळी 41 सामने खेळत त्याने 42 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. विशेष म्हणजे तो सचिन तेंडूलकरसोबत ड्रेसिंग रूम शेअर होता.
-सप्टेंबर 2014मध्ये कुलकर्णीने इंग्लंडविरुद्ध वनडेत पदार्पण केले. यावेळी मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. वनडेत पुढे 11 सामने खेळत त्याने एकूण 19 विकेट्स घेतल्या.
-2014मध्ये आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सने कुलकर्णीला 1 कोटी 10 लाखांना विकत घेतले होते.
-नोव्हेंबर 2014सालच्या श्रालंकाविरुद्धच्या कसोटीत कुलकर्णीने 10 षटकात 4 विकेट्स घेतल्या होत्या. याच सामन्यात रोहित शर्माने 264 धावा केल्या होत्या.
-जुलै 2015मध्ये कुलकर्णीने श्रद्धा खुरपुडेसोबत लग्न केले.