संपुर्ण नाव- दिनेश मोंगिया
जन्मतारिख- 17 एप्रिल, 1977
जन्मस्थळ- चंदिगड
मुख्य संघ- भारत, चंदिगड लायन्स, लँकशायर, लिसेस्टरशायर आणि पंजाब
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 28 मार्च, 2001
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 57, धावा- 1230, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 57, विकेट्स- 14, सर्वोत्तम कामगिरी- 3/31
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 38, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-1995 साली दिनेश मोंगियाने पंजाबकडून 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
-भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वोच्च धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखले जाते. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 धावा केल्या होत्या. त्याने केलेल्या ह्या धावा त्यावेळी संघात असणाऱ्या सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि सुरेश रैनापेक्षाही जास्त होत्या. एवढेच नव्हे, तर त्याच्या धावा या दक्षिण आफ्रिकेच्या सर्व फलंदाजांपेक्षाही जास्त होत्या.
-मोंगियाने 57 वनडे सामने खेळत 1230 धावा केल्या होत्या. यातील 11 सामने त्याने 2003सालच्या आयसीसी विश्वचषकात खेळले होते. यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याबदल्यात त्याला संघात स्थान देण्यात आले होते.
-विश्वचषकात खेळताना मोंगियाने अवघे 1 शतक ठोकले होते, जे त्याच्या वनडे कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले. यावेळी त्याने गुवाहाटी येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 159 धावा केल्या होत्या.
-मोंगियाने लँकशायर आणि लिस्टेटरशायरकडूनही क्रिकेट खेळले आहे. तसेच आयसीएलमध्ये चंदिगड लायन्सकडूनही त्याने क्रिकेट खेळले आहे.
-मोंगियाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना 2007 साली पंजाबकडून खेळला होता. त्यानंतर त्याला आयसीएलमध्ये सहभागी झाल्याने बीसीसीआयने निलंबीत केले होते.
-2018साली पंजाब क्रिकेट असोसिएशनमुळे त्याला राज्य निवड समितीत संधी मिळाली.