संपुर्ण नाव- गौतम गंभीर
जन्मतारिख- 14 ऑक्टोबर, 1981
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, इसेक्स, इंडिया रेड, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (लेगब्रेक)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 3 ते 5 नोव्हेंबर, 2004
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 11 एप्रिल, 2003
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 58, धावा- 4154, शतके- 9
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 147, धावा- 5238, शतके- 11
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 37, धावा- 932, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-गौतम गंभीर हा नवी दिल्लीतील व्यावसायिक कुटुंबातील आहे. तो अवघ्या 18 दिवसांचा असताना त्याच्या आजी-आजोबांनी त्याला दत्तक घेतले आणि तिथेच तो लहानाचा मोठा झाला.
-त्याने वयाच्या 10व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला संजय भारद्वाज आणि राजू टंडन यांनी क्रिकटेचे प्रशिक्षण दिले होते.
-1999-2000 साली दिल्लीकडून गंभीरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी 2 सामन्यात त्याने 45.33च्या सरासरीने 136 धावा केल्या होत्या. ज्यात त्याच्या सर्वोत्कृष्ट 73 धावांचा समावेश होता.
-2000 साली गंभीरचा बंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत निवड झाली होती. जिथून त्याच्या भारतीय संघातील निवडीच्या अनुशंगाने तयारी सुरु झाली.
-2002 साली त्याने सरावादरम्यान सलग द्विशतके ठोकली होती. त्यातील एक द्विशतक त्याने झिम्बाब्वेविरुद्ध केले होते. त्याच्या या कामगिरीमुळे पुढे त्याला वनडेत खेळण्याची संधी मिळाली.
-2003 साली गंभीरने बांग्लादेशविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले. त्याच्या अवघ्या तिसऱ्या वनडेत त्याच्या 71 धावांमुळे त्याला सलामीवीर पुरस्कारही मिळाला होता.
-2004 साली मुंबईतील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्याला 2 आकडी धावादेखील पार करता आल्या नव्हत्या. पण पुढील कसोटीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 96 धावा करत आपला फॉर्म सुधारला होता.
-2007ला गंभीर त्याच्या पहिल्या आयसीसी टी20 विश्वचषकात भारतातील सर्वोत्कृष्ट आणि जगातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यावेळी 7 सामन्यात त्याने 227 धावा केल्या होत्या. त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातील 54 धावांनी विश्वचषकावर भारताचे नाव कोरले होते.
-2008 साली गंभीरला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
-मार्च 2009मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत गंभीरच्या कारकिर्दीली नवे वळण मिळाले. त्याने कसोटीच्या दुसऱ्या डावात 436 चेंडूत 137 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता.यावेळी त्याने सलग 643 मिनिट फलंदाजी केली होती. 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात तेव्हापर्यंत कोणत्याच फलंदाजाने कसोटीत दुसऱ्या डावात एवढा वेळ फलंदाजी केली नव्हती. कसोटीत जरभरात असे करणारा तो पाचवा फलंदाज होता.
-त्याच्या या कामगिरीने 2009ला तो आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. तर याचवर्षी त्याला वर्षभरातील आयसीसी कसोटीपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-2010मध्ये गंभीरने न्यूझीलंविरुद्धच्या वनडेत भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. यावेळी 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात नाबाद 150 धावा करत मालिका खिशात घातली होती. त्याला त्याच्या 150 धावांमुळे मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.
-2010साली कसोटीच्या सलग 5 सामन्यात 5 शतके ठोकणारा भारतातील पहिला आणि जगातील 5वा क्रिकेटपटू ठरला होता.
-तर याचवर्षी सलग 11 कसोटीत 11 अर्धशतके ठोकत गंभीर वेस्ट इंडिजच्या व्हिव रिचर्ड्सनंतर असा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज ठरला.
-शिवाय सलग 4 कसोटीत 300 हून अधिक धावा करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला होता.
-2010 साली कोलकाता नाईट राइडर्सने गंभीरला 25 लाखांना विकत घेतलोे होते. त्यामुळे तो त्यावेळी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
-तब्बल 28 वर्षांनंतर भारताने 2011ला भारताने विश्वचषक पटकावले होते. यावेळी भारतीय संघात गंभीरचाही समावेश होता. त्याने विश्वचषकात 9 सामन्यात 43.66च्या सरासरीने 393 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो सर्वाधिक धावा करणारा चषकातील सहावा आणि सचिन तेंडूलकरनंतर भारतीय संघातील दुसरा फलंदाज ठरला होता.
-ऑक्टोबर 2011मध्ये गंभीरने व्यावसायिक कुटुंबातील नताशा जैन हिच्याशी लग्न केले. त्यांना अझीन गंभीर ही मुलगी आहे.
-2012 साली गंभीरने त्याच्या केकेआर संघाचे नेतृत्व करत विजेतेपद पटकावले. तर 2014 साली दुसऱ्यांदा परत विजयाचा मान मिळवला.
-गंभीरने त्याचा संघसहकारी विरेंद्र सेहवागसोबत 87 डावात सलामीला फलंदाजी करत 4412 धावांची भागीदारी केली होती. त्यांची ही भागीदारी भारतीय सलामीवीर फलंदाजी जोडीनी मिळून केलेली सर्वोत्कृष्ट धावांची भागीदारी होती.