---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर गुलाम पारकर

---Advertisement---

संपुर्ण नाव- गुलाम अहमद हसन मोहम्मद पारकर

जन्मतारिख- 25 ऑक्टोबर, 1955

जन्मस्थळ- कलुस्ते, महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत आणि मुंबई

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 10 ते 15 जून, 1982, ठिकाण – लॉर्ड्स

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 2 जून, 1982, ठिकाण – लीड्स

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 1, धावा- 7, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 10, धावा- 165, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-गुलाम अहमद हसन मोहम्मद असे पारकर यांचे 4 शब्दांचे नाव होते. त्यामुळे 4 शब्दांचे नाव असणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेले ते पहिलेच भारतीय क्रिकेटपटू होते.

-त्यांची गोलंदाजी शैली ही अशोक मंकड यांच्याप्रमाणे होती.

-गुलाम पारकर हे भारताचे सलामीवीर फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना 1982च्या इंग्लंड कसोटी दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. या दौऱ्यात त्यांनी त्यांच्या कारकिर्दीती पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळला होता. यावेळेला त्यांनी सुनिल गावसकर यांच्यासोबत सलामीला फलंदाजी केली होती. पण त्यांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नव्हती.

-त्यांनी पुढे 1982 आणि 1984च्या दरम्यान 10 वनडे सामने खेळले. यावेळी वनडे कारकिर्दीत 18च्या सरासरीने 165 धावा केल्या.

-वनडेतील त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी 1882-83च्या गुवाहाटी येथील सामन्यात केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी त्यांच्या वनडेतील सर्वोत्कृष्ट 42 धावा केल्या होत्या.

-देशातर्गत क्रिकेटमधील त्यांची फलंदाजी कामगिरी ही चांगली होती. त्यांनी 66 प्रथम श्रेणी सामन्यात 42च्या सरासरीने 4167 धावा केल्या होत्या. 1980-81च्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्यात  त्यांनी तमिळनाडू विरुद्ध 146 धावा आणि अंतिम सामन्यात दिल्ली विरुद्ध 121 धावा केल्या होत्या.

-पारकर हे रणजी ट्रॉफीतील बॉम्बे संघाचे दमदार खेळाडू होते. त्यांचा भाऊ झुल्फिकर हेदेखील बॉम्बे संघाील चांगले गोलंदाज होते.

-1981-82च्या रणजी ट्रॉफी हंगामात पारकर यांनी नाबाद 148, 40, 156, 84, 68 अशा धावा केल्या होत्या. यातील 156 धावांची मोठी खेळी त्यांनी बंगालविरुद्धच्या सामन्यात सुनिल गावसकर यांच्यासोबतच्या 421 धावांच्या भागीदारीवेळी केल्या होत्या.

-2014 साली पारकर यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते आम आदमी पार्टीचे नेते होते. त्यापुर्वी ते प्रसिद्ध प्रशिक्षकही होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---