संपुर्ण नाव- हरभजन सिंग
जन्मतारिख- 3 जुलै, 1980
जन्मस्थळ- जुलूंदर (आताचे जलंधर), पंजाब
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, एअर इंडिया ब्ल्यू, आशिया एकादश, चेन्नई सुपर किंग्स, द्रविड एकादश, इसेक्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन, वरिष्ठ भारतीय संघ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारत बोर्ड, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, इंडियन राईट एकादश, आंतरराष्ट्रीय एकादश, लँकशायर, मॅरिलबन क्रिकेट क्लब, मुंबई इंडियन्स, पंजाब, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, शेष भारतीय संघ आणि सुरी
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 25 ते 28 मार्च, 1998, ठिकाण – बेंगलोर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 17 एप्रिल, 1998, ठिकाण – शारजा
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006, ठिकाण – जोहान्सबर्ग
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 103, धावा- 2224, शतके- 2
गोलंदाजी- सामने- 103, विकेट्स- 417, सर्वोत्तम कामगिरी- 8/84
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 236, धावा- 1237, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 236, विकेट्स- 269, सर्वोत्तम कामगिरी- 5/31
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 28, धावा- 108, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 28, विकेट्स- 25, सर्वोत्तम कामगिरी- 4/12
थोडक्यात माहिती-
-जलंधरमध्ये जन्मलेला हरभजन हा त्याच्या 5 बहिणींचा एकुलता भाऊ होता. त्यामुळे त्याने एकवेळेला कॅनडाला ट्रक ड्राईव्हरची नोकरी करण्याचा विचार केला होता. पण त्याने क्रिकेटला जास्त प्राधान्य दिले.
-2000मध्ये त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी हरभजनवरती पडली होती. 2001मध्ये त्याने त्याच्या 3 बहीणिंचे लग्न केले.
-2001मध्ये जेव्हा अनिल कुंबळेला दुखापत झाल्याने हरभजनची बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निवड झाली होती. यावेळी तो 32 विकेट्स घेत संपूर्ण कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू ठरला. तसेच तो कसोटीत हॅटट्रीक घेणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला.
-त्याची कामगिरी पाहून 2002ला पंजाब सरकारने त्याला मानद पंजाब पोलिस उपअधीक्षकपद बहाल केले. त्यावेळीचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्याला ‘पंजाब का पुत्तर’ असे नावही दिले.
-2003साली त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीने त्याला अजुर्न पुरस्कार प्राप्त झाला. तसेच, 2009मध्ये तो पद्मश्री पुरस्काराचाही मानकरी ठरला.
-3 जुलै रोजी जन्मलेल्या हरभजनचा 3 हा लकी नंबर होता. मग भारताकडून असो किंवा मुंबई इंडियन्सकडून तो खेळताना तिसऱ्या क्रमांकाची जर्सी घालायचा.
-आयपीएल कारकार्दीत हरभजनने मुंबई इंडियन्सकडून खेळताना एकूण 147 विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे तो मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-2008मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली आणि 2017पर्यंत तो मुंबईकडून खेळला. तर, 2019च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने त्याला 2 तोटींना विकत घेतले.
-2008मध्ये हरभजनला आयसीससीने निलंबीत केले होते. त्याचवर्षी त्याला अँन्ड्र्यू सिमंड्सचा अपमान केल्यामुळे दंडही ठोठावण्यात आला होता. तसेच, एस श्रीसंतला आयपीएलमध्ये चापट मारल्या प्रकरणी वंदी घालण्यात आली होती.
-जुलै 2011मध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू कार्लटन बॉग याला बाद करत हरभजनने सर्वात युवा वयात कसोटीतील त्याच्या 400 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीच्या इतिहासात त्याच्याव्यतिरिक्त मुथय्या मुरलीधरनने हा पराक्रम केला आहे.
-29 ऑक्टोबर 2015ला हरभजनने त्याची प्रेमिका गीता बासराशी लग्न केले. त्यांना हिनाया हीर ही मुलगी आहे व जोवन वीर सिंग प्लाहा हा मुलगा आहे.
-2017च्या इंग्लंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-पुढे त्याने 2019च्या विश्वचषकात समालोचन केले. तसेच तो 2021 नंतर आयपीएलमध्येही सहभागी झालेला नाही.
हेही वाचा-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग