संपुर्ण नाव- जसप्रीत जसबिरसिंग बुमराह
जन्मतारिख- 6 डिसेंबर, 1993
जन्मस्थळ- अहमदाबाद
मुख्य संघ- भारत, गुजरात, भारत अ, इंडिया ग्रीन, 23 वर्षांखालील भारत संघ, मुंबई इंडियन्स आणि पश्चिम प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 5 ते 8 जानेवारी, 2018, ठिकाण – केपटाऊन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 23 जानेवारी, 2016, ठिकाण – सिडनी
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 26 जानेवारी, 2016, ठिकाण – ऍडलेड
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 24, धावा- 34, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 24, विकेट्स- 101, सर्वोत्तम कामगिरी- 6/27
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 67, धावा- 19, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 67, विकेट्स- 108, सर्वोत्तम कामगिरी- 5/27
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 55, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 55, विकेट्स- 66, सर्वोत्तम कामगिरी- 3/11
थोडक्यात माहिती-
-वयाच्या 14व्या वर्षी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने क्रिकेटला गांभिर्याने घ्यायला सुरुवात केली.
-वयाच्या 7व्या वर्षी हुमराहच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर शाळेतील प्राचार्य असणाऱ्या त्याच्या आईने त्याला लहानाचे मोठे केले. बुमराहला कॅनडामध्ये जाऊन स्थित व्हायचे होते. पण शेवटी क्रिकेटला त्याने आपले लक्ष्य बनवले.
-2013-14मध्ये बुमराहने विदर्भविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी गुजरातकडून खेळताना त्याने 7 विकेट्स घेतल्या.
-मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक जॉन राईट यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत प्रथम बुमराहला खेळताना पाहिले. त्याच्या गोलंदाजी शैलीने ते प्रभावित झाले होते.
-लगेच 2013मध्ये त्याला आयपीएलच्या मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली.त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पहिल्या षटकात विराट कोहलीला बाद केले होते. संपूर्ण सामन्यात त्याने 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-जसप्रीत बुमराह बाउंसर, यॉर्कर टाकू शकत होता. पण तो यात तरबेज नव्हता. शेवटी मुंबई इंडियन्समधील लसिथ मलिंगाने त्याला गोलंदाजी शैली सुधारण्यासाठी बरीच मदत केली होती.
-कठीण परिस्थितित गोलंदाजी करण्याच्या त्याच्या शैलीमुळे 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला टी20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-टी20त पदार्पण केल्यानंतर अवघ्या 7 महिन्यात बुमराहने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डर्क नॅन्सचा जलद 28 विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत त्याने 28 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
-2018मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध कसोटी सामना खेळत बुमराह 290वा कसोटीपटू ठरला. त्याने कसोटीत एबी डिवीलिअर्सची पहिली विकेट घेतली होती.
-अमिताभ बच्चन हे बुमराहचे आवडते अभिनेता आहेत. तर, ढोकळा हा प्रसिद्ध गुजराती पदार्थ हा देखील त्याला खूप आवडतो.