---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर कपिल देव

On: सोमवार, मार्च 23, 2020 9:04 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- कपिल देव रामलाल निखंज

जन्मतारिख- 6 जानेवारी, 1959

जन्मस्थळ- चंदिगड

मुख्य संघ- भारत, हरियाणा, नॉर्थम्पट्नशायर आणि वोर्सटरशायर

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 16 ते 21 ऑक्टोबर, 1978

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 1 ऑक्टोबर, 1978

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 131, धावा- 5248, शतके- 8

गोलंदाजी- सामने- 131, विकेट्स- 434, सर्वोत्तम कामगिरी- 9/83

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 275, धावा- 3783, शतके- 1

गोलंदाजी- सामने- 275, विकेट्स- 253, सर्वोत्तम कामगिरी- 5/43

थोडक्यात माहिती-

-कपिल देव यांचे वडील रामलाल हे बिल्डींग आणि टिंबर कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांचे पालक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी रावळपिंडीहून स्थलांतरित झाले होते.

-ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळले असून ते 1975 ते 1992 या 17 वर्षांच्या काळात हरियाणा संघाचे नियमित सदस्य होते.

-कपिल यांनी 1983च्या विश्वचषकात भारती संघाचे नेतृत्व करताना 303 धावा आणि 12 विकेट घेतल्या होत्या. तसेच 8 सामन्यात 7 झेलही घेतले होते. त्याचबरोबर या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 175 धावांची नाबाद खेळी देखील केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तेव्हा पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता.

– त्यांनी 1990मध्ये लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यात इंग्लंडचे फिरकीपटू एडी हेमिंग्स (Eddie Hemmings) यांच्या गोलंदाजीवर सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.

-फेब्रुवारी 1994 मध्ये त्यांनी श्रीलंकेच्या हर्षन तिलकरत्नेची विकेट घेत रिचर्ड हॅडली यांचा 431 विकेट्सचा विक्रम मागे टाकला. त्यांनी कारकिर्दीत कसोटीमध्ये 434 विकेट घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केले. पण त्यानंतर 8 वर्षे त्यांचा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित होता. नंतर तो विक्रम कर्टनी वॉल्श यांनी मोडला.

-कपिल हे त्यावेळेला दर तास 140 किलोमीटर प्रतितासच्या वेगाने वेगवान गोलंदाजी करत होते, त्यामुळे त्यांना हरियाणा हरिकेन असेही टोपणनाव देण्यात आले होते.

-ते वनडे क्रिकेटमध्येही सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते. त्यामुळे डेनिस लिली आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याप्रमाणेच तेही वनडे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते.

-तसेच क्रिकेट इतिहासात कपिल देव हे सर्वात युवा अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी 21 वर्षाच्या वयात 1000पेक्षा जास्त धावा आणि 100 पेेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या.

-कपिल हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 184 डावात कधीही धावबाद झालेले नाही. सर्वाधिक सलग डावात धावबाद न होणाचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे.

-कपिल देव यांना त्यांच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही दुखापतीमुळे सामन्यातून वगळण्यात आले नाही.

-1994मध्ये निवृत्तीनंतर ते 2 वर्षे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे(एनसीए) अध्यक्ष होते. तर, 2007मध्ये ते इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाल्याने त्यांना एनसीएच्या अध्यक्षपदला सोडावे लागले.

-तसेच ते ऑक्टोबर 1999 ते ऑगस्ट 2000 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यावेळी मॅच फिक्सिंग प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.

-कपिल हे 2008मध्ये सन्माननीय लेफ्टनंट कर्नल म्हणून भारतीय आर्मीशी जोडले गेले.

– 2018मध्ये आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेतही भारताकडून सहभागी झाले होते.

-कपिल देव यांनी काही चित्रपटात गेस्ट ऍपिएरन्स दिला आहे. यात मुझसे शादी करोगी, आर्यन: अनब्रेकेबल, चेन खूली की मेन खूली आणि इक्बाल या चित्रपटांचा समावेश आहे.

-त्यांनी त्यांचे तीन आत्मचरित्र लिहिले असून ‘गॉड डेक्री’ हे पहिले आत्मचरित्र 1985मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ‘क्रिकेट माय स्टाइल’ हे आत्मचरित्र 1987ला प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी 2004मध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले.

-कपिल यांनी रोमी हीच्याही विवाह केला आहे. त्यांनी तिला लग्नाची मागणीही अनोख्या पद्धतीने घातली होती. एकदा ट्रेनच्या प्रवासात ट्रेन एका प्रेक्षणीय स्थळी थांबली असताना त्यांनी तीला विचारले होते की तूला आपल्या मुलांना दाखवण्यासाठी या ठिकाणाचा फोटो घ्यायला आवडेल का? त्यावेळी रोमी यांना कपिल काय म्हणाले हे कळायला थोडा वेळ लागला पण त्यानंतर त्यांनी होकार दिला. कपिल आणि रोमी यांना एक मुलगी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---