संपुर्ण नाव- कर्ण विनोद शर्मा
जन्मतारिख- 23 ऑक्टोबर, 1987
जन्मस्थळ- मेरठ, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, चेन्नई सुपर किंग्स, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया रेड, इंडिया ग्रीन, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई इंडियन्स, रेल्वेज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनराइजर्स हैद्राबाद, 14 वर्षांखालील उत्तर प्रदेश आणि विदर्भ
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 9 ते 13 डिसेंबर, 2014, ठिकाण – ऍडलेड
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 13 नोव्हेंबर, 2014, ठिकाण – कोलकाता
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 7 सप्टेंबर, 2014, ठिकाण – बर्मिंगहम
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/95
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी – सामने – 2, धावा-0
गोलंदाजी– सामने – 2, विकेट्स – 0
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/28
प्रथम श्रेणी-
फलंदाजी – सामने – 77, धावा – 2235, शतक – 2, अर्धशतक – 15
गोलंदाजी- सामने – 77, विकेट्स – 210
एकाच सामन्यात 4+ विकेट्स- 9
एकाच सामन्यात 5+ विकेट्स- 12
थोडक्यात माहिती-
-मेरठचा रहिवासी असणाऱ्या कर्ण शर्माने 2012-13च्या रणजी ट्रॉफी हंगामात 3 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे बीसीसीआयने त्याला 25 वर्षांखालील सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवडले होते.
-2007मध्ये प्रथम श्रेणीत रेल्वेजकडून पदार्पण करताना त्याने पहिल्या सामन्यातच शतक ठोकले होते. पण पुढे त्याने गोलंदाजीवर अधिक लक्ष दिले.
-रविश्चंद्रन अश्विनच्या बदल्यात शर्माला ऍडलेडमधील कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. 2014मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत त्याने 4 विकेट्स घेतल्या होत्या.
-2014साली कर्णला जेव्हा आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबादने 3 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतले, तेव्हा तो प्रसिद्ध झाला. कोणत्या देशांतर्गत क्रिकेटपटूला आयपीएलमध्ये मिळणाऱ्या सर्वाधिक रक्कमेच्या यादीत तो दुसरा होता.
-2013साली नव्याने उद्यास आलेल्या सनराइजर्स है्राबादकडून खेळताना कर्णने 11 विकेट्स घेतल्या होत्या. तर 2014 साली 15 विकेट्स घेतल्या होत्या.
-आयपाएलमधील त्याच्या कामगिरीने त्याला नोव्हेंबर 2014मध्ये श्रीलंकाविरुद्ध वनडेत संधी मिळाली होती. त्यापुर्वी त्याने सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध टी20त पदार्पण केले होते. तो पण तो दोन्हीतही चांगली कामगिरी करू शकला नाही.
-2017मध्ये तो आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. यावेळी त्याने 13 विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सनेही त्याला आपल्या संघात घेतले होते. पण तो सातत्याने संघात नव्हता.
-2016 मध्ये सनराइजर्स हैद्राबाद आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. कर्ण या दोन्हीवळेला संघाचा भाग होता.
-2022 च्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्णने उत्तर प्रदेशचे नेतृत्व केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच शिवाय केली देशाची अशाप्रकारे सेवा
‘त्यांनी चांगली गोलंदाजी केली’, अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांच्या बॉलर्सचे बटलरकडून कौतुक