संपुर्ण नाव- कृष्णमाचारी श्रीकांत
जन्मतारिख- 21 डिसेंबर, 1959
जन्मस्थळ- मद्रास (आताचे चेन्नई)
मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, 1981, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 25 नोव्हेंबर 1981, ठिकाण – अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 43, धावा- 2062, शतके- 2, सर्वोत्तम कामगिरी- 123 धावा
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 146, धावा- 4091, शतके- 4, सर्वोत्तम कामगिरी – 123 धावा
गोलंदाजी- सामने- 146, विकेट्स- 25, सर्वोत्तम कामगिरी- 5/27
थोडक्यात माहिती-
-के श्रीकांत हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी चेन्नईच्या नामांकित इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते.
-संख्याशास्त्र कारणामुळे श्रीकांत यांनी त्यांचे आडनाव बदलले होते. कारण त्यांनी जेव्हा त्यांची स्वत:ची वेबसाइट सुरु केली होती. तेव्हा 990 रुपयांना ट्युटोरिअल विकले गेले होते. त्यामुळे त्यांनी 9 हा नंबर आपल्यासाठी लकी आहे म्हणून आपले 8 अक्षरी आडनाव 9 अक्षरी केले. (Shrikant to Srikkanth).
-1969मध्ये त्यांची 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली होती. त्यानंतर 1984मध्ये ते झिम्बाब्वे दौऱ्यासाठी युवा भारतीय संघात निवडले गेले. यावेळी त्यांच्यासह भारतीय संघात रवि शास्त्री, नवजोत सिंग सिंधू, लालचंद राजपूत, मोहम्मह अझरुद्दीन, राजू कुलकर्णी, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मनोज प्रभाकर आणि सदानंद विश्वनाथ हे खेळाडू होते.
-1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा ते भाग होते. तसेच त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ते सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. त्यांनी 38 धावा केल्या होत्या.
-1989च्या पाकिस्तान दौऱ्यावेळी श्रीकांत भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यावेळी सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले होते. त्यांनी कसोटी आणि वनडे दोन्हीतही भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
-2013मध्ये श्रीकांत हे त्याकाळातील प्रसिद्ध डान्स शो झलक दिखला जामध्ये सहभागी झाले होते.
-18 फेब्रुवारी 2008मध्ये श्रीकांत हे चेन्नई सुपर किंग्स संघाचे ऍम्बेसेडर बनले होते. तर, 20 डिसेंबर 2012ला ते सनराईजर्स हैद्राबाद संघाचे ऍम्बेसेडर होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिंधूची ‘सुवर्ण’ प्रतिक्षा संपली, भारताच्या शटलर्सची बीडब्ल्यूएफमध्ये दैदिप्यमान कामगिरी
ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडिया चारीमुंड्या चीत! अखेरच्या टी20 सह मालिका पाहुण्यांच्या खिशात