संपुर्ण नाव- मनोज कुमार तिवारी
जन्मतारिख- 14 नोव्हेंबर, 1985
जन्मस्थळ- हावडा, बंगाल
मुख्य संघ- भारत, अबहानी लिमीटेड, बंगाल, 19 वर्षांखालील बंगाल संघ, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, इंडिया ग्रीन, 19 वर्षांखालील भारत संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 3 फेब्रुवारी, 2008, ठिकाण – ब्रिसबेन
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 29 ऑक्टोबर, 2011, ठिकाण – कोलकाता
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 287, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 4/61
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 15, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-मनोज तिवारीची केविन पीटरसनशी तुलना केली जाते. त्याची धडाकेबाज फलंदाजी शैली आणि कोणत्याही गोलंदाजांचा सामना करण्याचे कौशल्य पीटरसनसारखे असल्याचे म्हटले जाते. तसेच तो तिवारीचा क्रिकेट आदर्शही आहे.
-वयाच्या 22व्या वर्षी तिवारीने रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण हंगामात 99.50च्या सरासरीने 796 धावा केल्या होत्या. ही कामगिरी त्याने 2006-07च्या रणजी ट्रॉफी हंगामात बंगालकडून खेळताना केली होती.
-2007मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संघी मिळाली होती. मात्र, त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीने ते शक्य झाले नाही.
-पुढे युवराज सिंगच्या बदल्यात जानेवारी 2008मध्ये ब्रिसबेनमधील वनडेत तिवारीला पदार्पणाची संधी मिळाली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने तिवारीला 2 धावांवर बाद केले होते.
-तिवारीला त्याची वनडेतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली पहिले आणि शेवटचे शतक ठोकले होते. हा कारनामा फक्त विरेंद्र सेहवागमुळे शक्य झाल्याचे त्याने सांगितले. तिवारीने 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या अंतिम सामन्यात आणि त्याच्या 5व्या वनडे सामन्यात नाबाद 104 धावा केलया होत्या. सेहवागने विश्रांती घेत, तिवारीला संधी दिल्याने हे शक्य झाले होते. तसेच तिवारी सामनावीरही बनला होता.
-2012ला पल्लेकले स्टेडियममध्ये श्रीलंकाविरुद्धच्या ट्वेंटी20 सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले होते. त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे तिशारा परेराला बाद करण्यात मदत झाली होती.
-2012मध्ये कोलंबोतील श्रीलंकाविरुद्धच्या वनडेत तिवारीने 61 धावा देत 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.
-दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामात तिवारीला 675000 युएसडीला विकत घेतले होते. तर, आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहभागी झाला. त्याने 2012च्या हंगामात केकेआरसाठी चांगली कामगिरी केली होती. परत 2014मध्ये त्याला दिल्लीने विकत घेतले.
-ऑक्टोबर 2015मध्ये तो बंगाल रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार होता. त्यावेळी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याची दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरशी बाताबाती झाली होती. त्यामुळे गंभीरला सामना शुक्लाच्या 70 टक्के तर तिवारीला सामना शुक्लाच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
-18 जुलै 2013मध्ये तिवारीने सुश्मिताशी 7 वर्षे असलेल्या मैत्रीनंतर लग्न केले.
-एप्रिल 2021 मध्ये राजकारणात पुढील कारकिर्द घडवण्यासाठी त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली. आता मनोज तिवारी पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री म्हणून काम पाहातो आहे.
– मनोज अजूनही स्थानिक क्रिकेट खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! क्रीडा मंत्री झालेल्या भारतीय खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
पाकिस्तान टॉपर असणाऱ्या ‘या’ विक्रमाच्या यादीत भारत पटकावणार दुसरा क्रमांक, बातमी लगेच वाचा