संपुर्ण नाव- मुरली कार्तिक
जन्मतारिख- 11 सप्टेंबर, 1976
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, इंडिया ग्रीन, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, लँकशायर, मिडलसेक्स, पुणे वॉरियर्स, रेल्वे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सोमरसेट आणि सुरी
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 24 ते 26 फेब्रुवारी, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 16 मार्च, 2002
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 20 ऑक्टोबर, 2007
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 88, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 24, सर्वोत्तम कामगिरी- 4/44
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 37, धावा- 126, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 37, विकेट्स- 37, सर्वोत्तम कामगिरी- 6/27
थोडक्यात माहिती-
-मुरली कार्तिक याची क्रिकेट कारकिर्द सुरु झाली तेव्हा त्याला हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे अय़ा क्रिकेटपटूंशी संघर्ष करावा लागत असे. त्यांच्या संघातील स्थानामुळे त्याला अधिक तर वेळा संघात पर्याय म्हणून ठेवण्यात येत असे.
-कार्तिक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला मध्यमगती गोलंदाज होता. त्याने गॅरी सोबर्स यांच्या खेळापासून प्रेरणा घेतली. त्याला वयाच्या 15व्या वर्षी बिशन सिंग बेदी आणि महिंदर सिंग यांच्याकडून गोलंदाजीचे प्रशिक्षण मिळाले.
-कार्तिक 16 वर्षांखालील दिल्ली संघाचा भाग होता. पण, त्याला 19 वर्षांखालील भारतीय संघात स्थान मिळवता आले नव्हते.
-कार्तिक हा उत्कृष्ट गोलंदाज जरी असला, तरी त्याचा फलंदाजीतही हातखंडा होता. त्याने 1996-97 ला मध्य प्रदेशविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 47 धावा केल्या होत्या. त्याच्या 96 धावा या प्रथम श्रेणीतील सर्वोत्कृष्ट धावा होत्या. शिवाय त्याने 21 अर्धशतकेही आपल्या नावावर नोंदवली होती.
-2000च्या इराणी ट्रॉफीत मुंबईविरुद्ध कार्तिकने दुसऱ्या डावात 70 धावा देत 9 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. पण, अंतिम सामन्यात त्याची गोलंदाजीची संधी सरनदिप सिंग यांच्यामुळे हुकली.
-कार्तिक हा एकमेव असा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने लीगचे वेगवेगळे 4 प्रकार खेळले आहेत. तो काउंन्टी क्रिकेटचा भाग असल्याने त्याने अनेक टी20 सामने खेळले. त्याने इंडियन प्रिमयर लीग (आयपीएल), चॅम्पियन्स लीग टी20, इंग्लंडमधील टी20 स्पर्धा, स्टॅनफोर्ड टी20 खेळले आहे.
2008मध्ये मिडलसेक्सकडून स्टॅनफोर्ड टी20 तर 2011मध्ये सोमरसेटकडून चॅम्पियन्स लीग टी20 खेळले आहे. तर तो आयपीएलच्या कोलकाता नाईट राईडर्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होता.
-शिवाय कार्तिक हा एकमेव असा भारतीय क्रिकेटपटू आहे, ज्याने 4 इंग्लिश संघाकडून काउंटी क्रिकेट खेळले आहेत.(लॅंकशायर, मिडलसेक्स, सोमरसेट आणि सुरी)
-2005मध्ये त्याने लॅंकशायरकडून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत 10 विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला होता. लँकशायरसाठी अशी कामगिरी करणारा तो पहिलाच परदेशी क्रिकेटपटू होती.
-2007मध्ये कार्तिकने ऑस्ट्र्रेलियाविरुद्धच्या वनडेत त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. यावेळी त्याने 27 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याची ही आकडेवारी ऑस्ट्रेलियात कोणत्याही भारतीय गोलंदाजाने केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. तर, कोणत्या डाव्या हाताच्या फिरकीपटूचीही ती सर्वोत्कृष्ट आकडेवारी होती.