---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर राहूल शर्मा

On: बुधवार, जून 3, 2020 10:11 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- राहूल शर्मा

जन्मतारिख- 30 नोव्हेंबर, 1986

जन्मस्थळ- जलंधर

मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, पुणे वॉरियर्स आणि पंजाब 

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 8 डिसेंबर, 2011, ठिकाण – इंदोर

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 1 फेब्रुवारी, 2012, ठिकाण – सिडनी

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 4, धावा- 1, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 3/43

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 2, धावा- 0, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/29

थोडक्यात माहिती-

-राहूल शर्माने क्रिकेटची सुरुवात पहिल्यांदा मध्यमगती गोलंदाजीने केली, पण पुढे तो त्याच्या प्रशिक्षकांच्या सल्ल्याने लेग स्पिन गोलंदाजी करू लागला.

-राहूलने त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण 25 डिसेंबर 2006 पंजाबकडून केले. यावेळी राजस्थानविरुद्ध त्याने पहिला सामना खेळला खरा. पण पुढे त्याला खेळण्यासाठी 2009 पर्यंत वाट पाहावी लागली.

-2009-10च्या रणजी ट्रॉफी हंगामात राहूलने 7 प्रथम श्रेणी सामने खेळत राहूलने 13 विकेट्स घेतल्या. तर, पुढच्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने अवघा 1 सामना खेळला.

-2010मध्ये राहूल आयपीएलच्या डेक्कन चार्जर्सकडून खेळला. यावेळी 6 सामन्यात त्याने 5 विकेट्स घेेतल्या. त्याचा इकोनॉमी रेट 8.08 इतका होता.

-2011मध्ये राहूलने पुणे वॉरियर्सकडून खेळताना 4-0-7-2 अशी आकडीवारी केली. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने केलेल्या या कारनाम्यामुळे त्याचा स्पेल हा 2011च्या संपूर्ण हंगामातील सर्वात इकोनॉमीकल स्पेल ठरला.

-ऑक्टोबर 2011मध्ये इंग्लंडविरुद्ध राहूलला वनडेत खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्याला यावेळी खेळायला मात्र मिळाले नाही. पण, इंदोरमधील त्याचवर्षीच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेतून राहूलने अविस्मरणीय पदार्पण केले. त्याने येताच 43 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

-सिडनीतील एएनझेड स्टेडियम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहूलने त्याचा पहिला टी20 सामना खेळला. यावेळी 3.4 षटके करत त्याने 1/27 अशी कामगिरी केली. पण पहिलेच षटक टाकत असताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.

पुढे मेलबर्नमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यातही 3.4 षटके टाकत राहूलने 2/29 अशी कामगिरी केली. तो त्याचा शेवटचा टी20 सामना ठरला.

-2010मध्ये आयपीएल सुरु होण्यापुर्वी राहूल बेल्स पाल्सी या चेहऱ्यावरील पॅरालिसिसचा सामना करत होता. पण, पुढे त्याने उपचार केल्याने तो लवकर बरा झाला.

-मे 2012मध्ये पुणे वॉरियर्सचा शेवटचा सामना संपल्यानंतर मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहूल आणि त्याचा संघसहकारी वेन पार्नल (दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाज) हे पार्टीला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे ड्रग्स घेतल्याचे समोर आल्यानंतर त्यांना 2013मध्ये दंड भरावा लागला होता. पण दोघानांही आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---