संपुर्ण नाव- रजिंदर सिंग घई
जन्मतारिख- 12 जून, 1960
जन्मस्थळ- जुलुदंर (आताचे जलंदर), पंजाब
मुख्य संघ- भारत आणि पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 5 डिसेंबर, 1984, ठिकाण – पुणे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 1/38
थोडक्यात माहिती-
-रजिंदर सिंग घई हे गोलंदाजी करताना स्विंगचा वापर करत होते. दुर्दैवाने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त 6 वनडे सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 87च्या सरासरीने केवळ 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-रजिंदर यांनी इंग्लंडविरुद्धच्या वनडे पदार्पणाच्या सामन्यात 9 षटकात 38 धावा देत 1 विकेट घेतली होती. मात्र, उर्वरित सामन्यात त्यांना 5 षटाकांपेक्षा जास्त षटके गोलंदाजी करायला मिळाली नव्हती.
-असे असले तरी, त्यांनी 1980च्या दशकात त्यांनी शारजाह येथे रॉथमन्स चषक आणि 1985-86मध्ये ऑस्ट्रेलिया येथे बेन्सन आणि हेजेस चषकात गोलंदाजी केली होती.
-त्यांची प्रथम श्रेणीतील कामगिरी चांगली होती. त्यांनी 48 सामन्यात 119 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी पहिल्याच सामन्यात 21 धावा देत 4 विकेट्स आणि दुसऱ्या सामन्यात 50 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण, पुढे त्यांच्या गोलंदाजीला उतरती कळा लागली.
-शिवाय त्यांची इराणी चषकातील कामगिरीही चांगली होती. त्यांनी 1985-86मध्ये 130 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर, पुढील वर्षात 117 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यांनी 1988 ते 89 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.