संपुर्ण नाव- रितिंदर सिंग सोधी
जन्मतारिख- 18 ऑक्टोबर, 1980
जन्मस्थळ- पटियाला, पंजाब
मुख्य संघ- भारत, अहमदाबाद रॉकेट्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 2 डिसेंबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 18, धावा- 280, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 18, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 2/31
थोडक्यात माहिती-
-रितिंदर सिंग सोधी या भारताच्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूने खूप कमी वयात संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
-1996साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी सोढी हे 15 वर्षांखालील विश्वचषक संघाचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली संघाने चषकावर आपले नाव कोरले होते.
-तसेच, यावेळी ते विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. तर, 16 विकेट्स घेत विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजही होते.
-पुढे त्यांची 19 वर्षांखालील विश्वचषकात मोहम्मद कैफ यांच्या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली होती. यावेळी सोढी यांनी 10 षटके गोलंदाजी करत केवळ 26 धावा दिल्या होत्या. जरी त्यांना विकेट मिळवता आली नसली तरी 2000सालचा हा विश्वचषक भारताने पटकावला होता.
-सोधी यांच्या कमी वयातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना भविष्यातील कपिल देव असे म्हटले जाऊ लागले होते. त्यांची गोलंदाजी आणि फटकेबाज फलंदाजीमुळे त्यांची अशी तुलना केली जात होती. पण, पुढे त्यांची कामगिरी जास्त उल्लेखनीय ठरली नाही.
-सोधी यांनी केवळ 2000-02 या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यावेळी त्यांना युवराज सिंग, मोहम्मद कैफ आणि संजय बांगर अशा खेळांडूंच्या स्पर्धेत टिकायचे होते. पण ते केवळ 18 वनडे सामने खेळू शकले. यातही त्यांनी केवळ 280 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-2007 आणि 2008-09 या 2 हंगामात ते अहमदाबाद रॉकेट्स संघाकडून आयसीएलचा भाग होते. मात्र, बीसीसीआयच्या मागणीमुळे त्यांनी आयपीएलकडे वळले. ते काही काळ किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग होते. पण त्यांना सतत होणाऱ्या दुखापतीमुळे ते बराच काळ संघातून बाहेर होते.
-सोधी यांनी त्यांचा शेवटचा ट्वेंटी20 सामना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 2010 साली खेळला. हा सामना पंजाब विरुद्ध जम्मू काश्मिर संघात झाला होता.
-सोधी हे खूप परोपकारी स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते अनेक सेवाभावी उपक्रमांसाठी काम करतात. ते क्रिकेटपटू असल्याचा फायदा घेऊन वंचित लोकांची मदत करतात.
क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सोधी हे टिव्हीवरील क्रिकेट शोमध्ये क्रिकेट तज्ञ म्हणून पाहायला मिळतात.
-क्रिकेट विश्लेषकानंतर ते 2014 साली सामना रेफरी बनले.