संपुर्ण नाव- रोहन सुनिल गावसकर
जन्मतारिख- 20 फेब्रुवारी, 1976
जन्मस्थळ- कानपूर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, बंगाल, आयसीएल भारत एकादश, कोलकाता नाईट रायडर्स आणि कोलकाता टायगर्स
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 18 जानेवारी, 2004
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 11, धावा- 151, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 11, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/56
थोडक्यात माहिती-
-रोहन गावसकर हे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचे सुपुत्र आहेत. रोहनला त्याच्या वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवता आली नाही. केवळ वडीलच नाही तर, रोहनचे मामा गुंडप्पा विश्वनाथ हेदेखील भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज होते.
-कानपूर येथे जन्मलेल्या रोहनचा त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीशी म्हणजेच स्वाती मानकर हिच्याशी 2003मध्ये विवाह झाला. ती आर्किटेक्ट प्रकाश मानकर यांची मुलगी आहे. त्यांना विवान नावाचा मुलगा आहे.
-वडील सुनील गावसकरांनी त्यांच्या आवडत्या तीन क्रिकेटपटूंच्या नावावरून रोहनचे अजून एक नाव ठेवले होते. त्यांनी रोहन कान्हई, एमएल जयसिम्हा आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्या नावावरून त्याला रोहन जयविश्वा असे नाव दिले होते.
-रोहनने 2003-04मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे वनडे पदार्पण केले होते. यावेळी त्याने अवघे काही मिनिट फलंदाजी करत केवळ 2 धावा केल्या होत्या. तर, 9 षटके गोलंदाजी करत अँन्ड्र्यू सिमंड्स यांची विकेट घेतली होती. ती त्यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव विकेट ठरली.
-एडलेडमधील व्हिबी सीरिजच्या 8व्या सामन्यात रोहनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले होते. तो सामना भारताने 3 धावांनी जिंकला होता.
-रोहनने भारताकडून 11 वनडे सामने खेळले. ज्यातील एकही सामना त्याने भारतीय मैदानावर खेळला नाही. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि नेडरलँडमध्ये त्याचे वनडे सामने खेळले.
-मुंबई संघाकडून आपल्याला जास्त खेळण्याची संधी मिळत हे पाहता रोहनने बंगाल संघात प्रवेश केला. बंगालकडून त्याने 10 वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 117 सामने खेळले. यात त्याने 44.19च्या सरासरीने 6938 धावा केल्या होत्या.
-2001-02मध्ये तो बंगाल रणजी ट्रॉफी संघाचा कर्णधार होता. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली बंगालला चांगली कामगिरी करता आली नाही.
-बीसीसीआयने अनधिकृत जाहीर केलेल्या आयसीएलच्या कोलकाता टायगर्स संघाकडून 2007मध्ये रोहनने क्रिकेट खेळले होते.
-आयसीएलनंतर रोहनला आयपीेलच्या पहिल्या मोसमात (2008) कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळण्याची संधी मिळाली.
-2012मध्ये रोहनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. त्याने त्याच्या वडीलांप्रमाणे निवृत्तीनंतर समालोचनाचे क्षेत्र निवडले. त्याने आयपीएलमध्ये समालोचन केले होते.