संपुर्ण नाव- रुद्र प्रताप सिंग
जन्मतारिख- 6 डिसेंबर, 1985
जन्मस्थळ- रायबरेली, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, डेक्कन चार्जर्स, भारत अ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, कोची टस्कर्स केरळ, लीसेस्टरशायर, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष एकादश, मुंबई इंडियन्स, राइझिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख -21 ते 25 जानेवारी, 2006
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 4 सप्टेंबर, 2005
आंतराराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 13 सप्टेंबर, 2007
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 14, धावा- 116, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 14, विकेट्स- 40, सर्वोत्तम कामगिरी- 5/59
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 58, धावा- 104, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 58, विकेट्स- 69, सर्वोत्तम कामगिरी- 4/35
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 2, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 15, सर्वोत्तम कामगिरी- 4/13
थोडक्यात माहिती-
-रुद्र प्रताप सिंग हे मिडल क्लास कुंटुंबातले आहेत. त्यांचे वडील शिव प्रताप सिंग हे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या तांत्रिक शाखेत ऑपरेटर होते. आरपी सिंग यांना क्रिकेट क्षेत्रात आणण्यात त्यांच्या वडिलांचे मोठे योगदान आहे.
-त्यांच्या वडिलांनी सिंग यांना क्रिकेटसाठी प्रोत्साहित करण्यासाठी लखनऊ येथील नामांकित महाविद्यालय गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स महाविद्यालय येथे शिक्षणास पाठवले होते.
-त्यावेळेला ते लखनऊ येथे महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्येच राहत होते. या हॉस्टेलमध्ये मोहम्मद कैफ, सुरेश रैना आणि ज्ञानेंद्र पांडे असे मोठ-मोठे क्रिकेटपटू होते.
-सिंग यानी त्यावेळेला रैनासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे 19 वर्षाखालील भारतीय संघात सिंग आणि रैना हे एकमेकांचे संघ सहकारी होते.
-2004 साली 19 वर्षांखालील विश्वचषकात बांगलादेश संघाविरुद्ध 24.75च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांना वयाच्या 18व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.
-पुढे रणजी ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात 34 विकेट्स घेत, ते रणजी ट्रॉफीतील सर्वात जास्त विकेट घेणारे गोलंदाज ठरले होते.
-जानेवारी 2006मध्ये त्यांनी फैझलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच 5 विकेट्स घेत आरपी हे सलामीवीर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.
-2007मध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स स्टेडियमवर 5 विकेट्स घेणारे ते 10वे भारतीय क्रिकेटपटू ठरले होते.
-2007मधील आयसीसी ट्वेंटी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपला पहिला विजय मिळवला होता. यावेळी आरपी यांनी 12.67च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या होत्या.
-आरपी यांनी अहमदाबाद येथे 2012मध्ये देवांशी पोपट यांच्याशी लग्न केले. देवांशी ही गुजरातचे जेष्ठ वकिल मनोज पोपट यांची मुलगी आहे. आरपी आणि देवांशी यांची रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात भेट झाली होती. त्यांना आता इरा आर्या सिंग ही एक मुलगीही आहे.
-2013 साली आरपी यांचे मुदगल रिपोर्टमध्ये नाव आले होते. त्यांची दिल्ली पोलिसांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भात विचारपूस केली होती. मात्र, नंतर त्याचे पुरावे न मिळाल्याने त्यांना निर्दोष ठरवण्यात आले.
-आरपी यांनी आज तक स्टुडिओमध्ये क्रिकेट तज्ञाचे काम केले आहे. ते आता गुजरातकडून रणजी ट्रॉफीत खेळतात.