संपुर्ण नाव- साईराज वसंत बहुुतुले
जन्मतारिख- 6 जानेवारी, 1973
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, आंध्र, आसाम, महाराष्ट्र, मुंबई, सुरी क्रिकेट बोर्ड आणि विदर्भ
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- लेगब्रेक
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 18 ते 22 मार्च, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 22 डिसेंबर, 1997
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 39, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 1/32
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 23, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/31
थोडक्यात माहिती-
-साईराज बहुतुले यांचे वडील वसंत हे देखील क्रिकेटपटू होते. त्यांनी 1953मध्ये महाराष्ट्रकडून 2 सामने खेळले आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही सामन्यात मिळून 64 धावा केल्या होत्या.
-1980 साली निवडकर्त्यांना मुंबई संघासाठी सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी, जतिन परांजपे, मयूर कद्रेकर, अभिजीत काळे यांच्यासह बहुतुले असे क्रिकेटपटू मिळाले. त्यांनी वयोगटातील बरेचसे सामने मुंबईकडून खेळले होते.
-फेब्रुवारी 1988मध्ये शारदाश्रम विद्यामंदीरकडून खेळताना तेंडूलकर आणि कांबळीने 664 धावांची भागीदारी केली होती. यावेळी विरुद्ध एसटी. झॅव्हिअर महाविद्यालयाकडून खेळणाऱ्या बहुतुलेने नाबाद 69 धावा केल्या होत्या.
-जुलै 1990मध्ये बहुतुले आणि त्यांचे 2 मित्र यांचा मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे कार अपघात झाला होता. तेव्हा ते कोमात गेले होते. तसेच पायही फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यासह असणारे गायक जगजीत आणि चित्रा यांचा मुलगा विवेक सिंग याचा मृत्यू झाला होता. तर दुसरा मित्र जखमी झाला होता.
-त्यानंतर त्यांनी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित फ्रँक टिझन कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता.
-त्यानंतर बहुतुलेंनी ऑक्टोबर 1991मध्ये कूच बिहार ट्रॉफीतील 19 वर्षांखालील बडोदा संघाविरुद्ध क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. यावेळी त्याने पहिल्याच डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. तर, पुढे 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळतानाही त्याने हा कारनामा केला होता.
-पुढे त्याला डिसेंबर 1991मध्ये बॉम्बे संघातून गुजरातच्या 4 फलंदाजांना बाद करत रणजी ट्रॉफीत शानदार पदार्पण केले होते.
-शेष भारतीय संघाविरुद्ध 1997-98च्या इराणी ट्रॉफीत बहुतुलेने 71 धावा केल्या होत्या. तर, 13 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. यात दुसऱ्या डावातील 71 धावांत 8 विकेट्सचा समावेश होता. ही त्याची प्रथम श्रेणीतील सर्वोत्तम कामगिरी होती.
-बहुतुलेने अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. तो 2003-04च्या यशस्वी रणजी ट्रॉफीत मुंबई संघाचा कर्णधार होता. तर, 2008-09मध्ये महाराष्ट्र संघात प्रवेश करत तो त्यांच्या रणजी ट्रॉफी विजयातही भागीदार ठरला होता.
-बहुतुले हा एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू होता. त्याने 1993-94 आणि 2002-03 या रणजी ट्रॉफी हंगामात 300पेक्षा जास्त धावा आणि 30 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या. तर, रणजी ट्रॉफी कारकिर्दीत त्याने 4000 धावा आणि 400पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या.
-बहुतुलेने 2005 ते 2007 असे 2 हंगाम महाराष्टकडून, 2009-10 हा हंगाम आसामकडून, 2010-11 हा हंगाम आंध्राकडून आणि शेवटी 2011-12हा हंगाम विदर्भकडून खेळला होता. तर, या सर्व संघांचे तो कर्णधारही होते.
-जानेवारी 2013मध्ये बहुतुलेने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-बहुतुलेची आंतरराष्ट्रीय कारकिर्द मात्र चांगली राहिली नाही. त्याने 2 कसोटीत 3 विकेट्स आणि 39 धावा केल्या. तर, 8 वनडेत 2 विकेट्स आणि 23 धावा केल्या होत्या.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर बहुतुले प्रशिक्षक बनले. ते सुरुवातीला विदर्भ संघाचे प्रशिक्षक होते. तर, 2014मध्ये केरळ संघाला त्यांनी प्रशिक्षण दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल
बार्थोलोमेव ऑग्बेचेची हॅटट्रिक; हैदराबादचा यजमान गोवावर दणदणीत विजय, पुन्हा नंबर वन!