---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

On: सोमवार, डिसेंबर 5, 2022 10:14 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- शिखर धवन

जन्मतारिख- 5 डिसेंबर, 1985

जन्मस्थळ- दिल्ली

मुख्य संघ- भारत, डेक्कन चार्जर्स, दिल्ली, दिल्ली डेअरडेविल्स, दिल्ली कॅपिटल्स, 16 वर्षांखालील दिल्ली संघ, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इंडिया मास्टर्स, इंडिया रेड, वरिष्ठ भारतीय संघ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई अ, मुंबई इंडियन्स, उत्तर विभाग, शेष भारतीय संघ, सनराइजर्स हैद्राबाद आणि युडब्ल्यूआय कुलगुरू एकादश

फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 14 ते 18 मार्च, 2013, ठिकाण – मोहाली

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 20 ऑक्टोबर, 2010, ठिकाण – विशाखापट्टणम

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 4 जून, 2011, ठिकाण – पोर्ट ऑफ स्पेन

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 34, धावा- 2315, शतके- 7

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 165, धावा- 6782, शतके- 17

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 68, धावा- 1759, शतके- 0

थोडक्यात माहिती-
-सोनेट क्रिकेट क्लब हे एक संस्था आहे, जिथे अतुल वासन, मनोज प्रभाकर, आशिष नेहरा, रमन लांबा, अजय शर्मा आणि आकाश चोप्रा अशा क्रिकेटपटूंनी स्वतला घडवले आहे. वयाच्या 12व्या वर्षापासून शिखर धवनही या संस्थेत होता. तिथे त्याला तारक सिन्हा यांनी प्रशिक्षण दिले.

-सिन्हा यांनी पीटीआयला सांगितल्यानुसार विद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत धवनने 15 वर्षांखालील संघातून खेळताना शतकी खेळी केली होती. विशेष म्हणजे त्याने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षणाने केली होती.

-भारतीय संघाकडून खेळण्यापुर्वी धवन हा इंडिया मास्टर्सकडून खेळला आहे. मे 2005मध्ये अबू दाबी येथील त्सुनामी रिलिफ स्पर्धेत पाकिस्तान मास्टर्स आणि श्रीलंका मास्टर्सविरुद्ध तो खेळला होता.

-2005मधील चॅलेंजर ट्रॉफीत धवनने एमएस धोनीसोबत वरिष्ठ भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी धोनीला 3 वनडे सान्यांचा अनुभव होता. तर, धवन हा अवघ्या 19 वर्षांचा होता. यावेळी दोघांनी मिळून 187 धावांची भागिदारी रचली होती.

-2008मध्ये धवनला आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्समध्ये स्थान मिळाले होते. पण दिल्लीने आशिष नेहरासोबत त्याची अदलाबदल केली होती. पुढे 2009-10मध्ये तो मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला.

-धवनला युवा वयापासून बाईक्सची आवड होची. त्याच्याकडे इनफिल्ड ही बाईक आहे. तर 2010मध्ये त्याने स्वॅन्की सुझुकी हयाबुसा ही बाईक विकत घेतली.

-धवनच्या शरीरीवर बरेच टॅट्यू आहेत. विना पानांचे झाड, कार्प डायम कोट अशा टॅटूंचा यात समावेश आहे.

-धवनला त्याचे संघसहकारी जट-जी म्हणतात. तसेच त्याला गब्बर असेही म्हणतात. त्याच्या लूकमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे.

-ऑस्ट्रेलियन नागरिकत्त्व असणारी भारतीय वंशाची बॉक्सर आयेशा मुखर्जी हिच्याशी धवनने लग्न केले. तिला पहिल्या 2 मुली होत्या. हरभजन सिंगने धवन आणि आयेशाची फेसबुकद्वारे ओळख करून दिली. त्यांना 2014मध्ये जोरावर नावाचा मुलगा झाला. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांचा घटस्पोट झाल्याचे आयेशाने सोशल मीडिवर पोस्ट करत सांगितले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी
…म्हणून पुण्यात 32 वर्षांपूर्वी झालेला ‘तो’ सामना सचिन तेंडुलकरसाठी ठरला खास 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---