---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर सिद्धार्थ कौल

On: बुधवार, मे 19, 2021 10:47 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- सिद्धार्थ तेज कौल

जन्मतारिख- 19 मे, 1990

जन्मस्थळ- पठाणकोट, पंजाब

मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, भारत ब, इडिया ब्ल्यू, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, कोलकाता नाईट रायडर्स, उत्तर विभाग, शेष भारतीय संघ, पंजाब, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि सनराइजर्स हैद्राबाद

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 12 जुलै, 2018, ठिकाण – नॉटिंघम

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध आयर्लंड, तारिख – 29 जून, 2018, ठिकाण – डब्लिन

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 3, धावा- 1, शतके- 0

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/35

थोडक्यात माहिती-

-सिद्धार्थ कौलचे वडिल तेज कौल यांनी 1970च्या दशकात जम्मू आणि काश्मिर संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. तर, त्याचा भाऊ उदय कौल याने पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.

-विशेष म्हणजे कौलची आई संध्या कौल या स्पोर्ट्स ऑथोरेटी ऑफ इंडियाच्या जिमनॅस्टिक प्रशिक्षक आहेत.

-पंजाबच्या पठाणकोटमध्ये जन्मलेला कौल याने 2007मध्ये पंजाबकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावेळी त्याचा भाऊ हा संघाचा यष्टीरक्षक होता. त्याने ओडिसाविरुद्ध पहिल्या डावात 97 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

-तसेच पंजाबकडून कौलने 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील क्रिकेट खेळले आहे.

-कौल हा 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्यावेळी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आदेशावरून त्याने शेवटच्या षटकात गोलंदाजी करत संघाच्या विजयाला योगदान दिले होते. संपूर्ण विशवचषकात 5 सामन्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या होत्या.

-19 वर्षांखालील यशस्वी विश्वचषकातील अनेक खेळाडूंना पुढे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रवेश मिळाला होता. अशात सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने त्याला निवडले होते.

-कौलला झालेल्या दुखापतींमुळे तो 2012पर्यंत क्रिकेटपासून दूर होता.

-2013 आणि 2014मध्ये दिल्ली डेअरडेविल्सने कौलला संघात स्थान दिले होते. तर, आयपीएल2016मध्ये तो सनराइजर्स हैद्रबादकडून प्रभावी खेळी करू शकला नाही. मात्र, 2017मध्ये त्याने हैद्राबाद संघाकडून नेत्रदिपक प्रदर्शन केले. त्याने संपूर्ण हंगामात 10 सामने खेळत 17 विकेट्स घेतल्या होत्या.

-अखेर 2018मध्ये सनराइजर्स हैद्राबादकडून खेळताना कौलने भुवनेश्वर कुमारप्रमाणे नकल गोलंदाजी केली. जे त्याचे विशेष हत्यार ठरले. त्याने संपूर्ण हंगामात 21 विकेट्स घेतल्या आणि तो संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

-त्याच्या आयपीएलमधील खेळीने त्याला इंग्लंडच्या वनडे दौऱ्यावर आणि आर्यलँडच्या टी20 दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळवून दिली.

-28 वर्षाचा असताना डब्लिन येथील दुसऱ्या टी20 सामन्यात पदार्पण करणाऱ्या कौलने 2 षटकात 4 धावा देत 1 विकेट्स घेतली होती.

-भुवी आणि उमेश यादव संघात असल्याने कौलला जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळाले नाही. त्याने फेब्रुवारी 2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---