संपुर्ण नाव- श्रीधरन श्रीराम
जन्मतारिख- 21 फेब्रुवारी, 1976
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, स्कॉटलँड, अहमदाबाद रॉकेट्स, दिल्ली डेअरडेविल्स, महाराष्ट्र, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 19 मार्च, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 81, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 3/43
थोडक्यात माहिती-
-श्रीधरन श्रीराम यांचे वडील डॉ. एस. डी. श्रीधरन हे कर्नाटकमधील प्रख्यात व्हायोलिन वादक आहेत.
-1992-93च्या मोसमातून 19 वर्षांखालील भारतीय संघात पदार्पण करणारे श्रीधरन यांनी संपूर्ण मोसमात 29 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-तर, तमिळनाडूकडून रणजी ट्रॉफी 1999-2000च्या संपूर्ण हंगामात त्यांनी 1075 धावा केल्या होत्या. यात त्यांच्या 5 शतकांचा समावेश होता. तर, पुढील 2 हंगामात त्यांनी अनुक्रमे 1263 आणि 1057 धावा केल्या होत्या.
-डाव्या हाताच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूने 2002-03च्या रणजी ट्रॉफी हंगामात श्रीधरन यांनी 33च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या होत्या.
-देशांतर्गत क्रिकेमधील त्यांच्या कामगिरीने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
-2000साली श्रीधरन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. मात्र, त्यांना सुरुवातीला चमकदार कामगिरी करता आली नाही.
-पण, नशिबाने 2004-05साली बांगलादेश दौऱ्यावर त्यांना परत वनडेत पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांचे पहिले अर्धशतक केले होते.
-श्रीरधरन यांनी तमिळनाडू संघासह महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश आणि स्कॉटलँड संघाकडून क्रिकेट खेळले होते.
-डिसेंबर 2007 साली श्रीराम यांनी इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. यावेळी ते चेन्नई सुपरस्टार्स आणि नंतर अहमदाबाद रॉकेट्स संघाकडून खेळले.
-पुढे त्यांना आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून क्रिकेट खेळले.
-श्रीधरन यांना 2007-08 साली इग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डकडून प्रशिक्षणाचे आमंत्रण आले. त्यांनी न्यूझीलंड आणि नेदरलँड संघाचेही प्रशिक्षण केले आहे. या काळातही ते क्रिकेट खेळत होते.
-श्रीधरन यांनी तमिळनाडू अ संघाचे प्रशिक्षण केले आहे.
-निवृत्तीनंतर 2015 साली त्यांची दिल्ली डेअरडेविल्स संघाचे सहकारी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. ते 2017 साली भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते.
-श्रीधरन यांना आयपीएल 2019 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले होते.
-श्रीधरन यांनी याआधी किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून काम केले आहे. तसेच श्रीरामने ऑस्ट्रेलिया संघाचेही फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले आहे.