संपुर्ण नाव- रामचंद्र सुधाकर राव
जन्मतारिख- 8 ऑगस्ट, 1952
जन्मस्थळ- बंगलोर, कर्नाटक
मुख्य संघ- भारत आणि कर्नाटक
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 22 फेब्रुवारी, 1976
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 4, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-भारताचे फलंदाज गुंडप्पा विश्वनाथ हे सुधाकर राव यांचे आदर्श क्रिकेटपटू होते. सुधाकर यांना गुंडप्पा यांच्या खेळातून बरीच प्रेरणा मिळाली होती.
-कर्नाटकच्या सुधाकर यांनी रणजी ट्रॉफीत त्यांच्या राज्याच्या संघाला म्हणजेच कर्नाटक संघाला त्यांचे पहिले 3 रणजी चषक जिंकण्यात मोलाचे सहाय्य केले होते. 1973-74, 1977-78 आणि 1982-83मध्ये कर्नाटक संघाने रणजी ट्रॉफीचे चषक जिंकले होते.
-1970च्या दशकात ते गुंडप्पा आणि ब्रिजेश पटेल यांच्यासह कर्नाटक संघातले मधल्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज म्हणून ओळखले जात होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 40च्या सरासरीने 4014 धावा केल्या होत्या. यातील 3731 धावा त्यांनी कर्नाटक संघाकडून केल्या होत्या.
-याशिवाय त्यांनी काही सामन्यात यष्टीरक्षणही केले होते.
– त्यांनी 1973-74च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत बॉम्बेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाकडून खेळताना अजित वाडेकर यांना धावबाद केले होते.
-1975-76मध्ये हैद्राबाद संघाविरुद्ध केलेल्या नाबाद 200 धावांमुळे सुधाकर यांना राष्ट्रीय संघात संधी मिळाली होती. त्यांनी इडन गार्डन येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकमेव वनडे सामना खेळला होता. यावेळी न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्यांनी अवघ्या 4 धावा केल्या होत्या.
-जरी त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्यांनी रणजी ट्रॉफीतील चांगले योगदान दिले आहे.
-निवृत्तीनंतर सुधाकर हे रणजी ट्रॉफीमध्ये सामनाधिकारी देखील होते.