संपुर्ण नाव- तिरुमलाई अनंथनपिल्लई शेखर
जन्मतारिख- 28 मार्च, 1956
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)
मुख्य संघ- भारत, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 23 ते 28 जानेवारी, 1983, ठिकाण – लाहोर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 21 जानेवारी, 1983, ठिकाण – कराची
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
गोलंदाजी – सामने- 2, विकेट्स- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/23
थोडक्यात माहिती-
-उंच वेगवान भारतीय गोलंदाज तिरुमलाई शेखर हे 80च्या काळातील भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज होते. मात्र, त्यांना चांगले प्रशिक्षण न मिळू शकल्याने त्यांची कामगिरी जास्त प्रशंसनीय ठरली नव्हती.
-त्यांनी केरळ विरुद्धच्या 1982-83मधील रणजी ट्रॉफी सामन्यात एकूण 9 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-शेखर यांच्या दुलिप ट्रॉफीतील चांगल्या प्रदर्शनाने त्यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. भारताचे क्रिकेटपटू मदनलाल यांना दुखापत झाल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले होते.
-त्यांनी 1982-83मध्ये मदनलाल यांच्या बदल्यात पाकिस्तानविरुद्धचे 2 कसोटी सामने खेळले होते. मात्र, त्यांनी दोन्ही कसोटीत विकेट्सही घेता आल्या नव्हत्या तसेच धावाही करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना पुढे एकही कसोटी सामना खेळायला मिळाला नव्हता.
– शिवाय त्यांनी वनडेतही केवळ 4 सामने खेळले होते. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत त्यांनी 4 षटके गोलंदाजी केली होती. यावेळी त्यांना एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर त्यांनी 1985च्या इंग्लंडविरुद्धच्या वनडेतील नागपूर येथील सामन्यात 2 आणि चंदीगड येथील सामन्यात 3 अशा 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-शेखर यांनी प्रथम श्रेणीत 44 सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 130 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यांनी 1987-88पर्यंत तमिळनाडू संघाकडून त्यानंतर मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत सामने खेळले होते. मध्य प्रदेशकडून खेळताना त्यांनी सलग 2 सामन्यात 8 आणि 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-निवृत्तीनंतर शेखर यांनी एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षकाचे काम केले आहे. यावेळी त्यांनी अनेक मोठ-मोठ्या गोलंदाजासह काम केले आहे.
-शिवाय निवड समितीमध्ये त्यांनी दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले आहे.
-त्यानंतर ते आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाचे व्यवस्थापक होते.