संपुर्ण नाव- सगी लक्ष्मी वेंकटपति राजू
जन्मतारिख- 9 जुलै, 1969
जन्मस्थळ- आलमुरु, हैदराबाद आणि आंध्रप्रदेश
मुख्य संघ- भारत, हैदराबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 2-5 फेब्रुवारी, 1990
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 1 मार्च, 1990
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 28, विकेट्स- 93, सर्वोत्तम कामगिरी– 6/12
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 53, विकेट्स- 63, सर्वोत्तम कामगिरी- 4/46
थोडक्यात माहिती-
-1992 आणि 1996 सालच्या दोन्ही विश्वचषकात राजूंना संधी देण्यात आली होती. काही वर्षे चांगली कामगिरी करूनही राजू यांना राष्ट्रीय संघात नियमित स्थान मिळू शकले नाही.
-मायदेशातील सामन्यात ते उत्तमप्रकारे गोलंदाजी करत. मात्र, त्यांना देशाबाहेरील सामन्यात चांगले गोलंदाजी प्रदर्शन करता आले नाही. राजूंनी मायदेशात खेळलेल्या 16 कसोटी सामन्यात एकूण 71 विकेट्स घेतल्या होत्या. तर, देशाबाहेरील मैदानात त्यांनी 12 सामन्यात अवघ्या 22 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यांनी 1994च्या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्यांनी त्यावेळच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 20 विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांच्या एका डावातील 2 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाचा समावेश होता.
-त्यानंतर त्यांच्या कसोटी कारकिर्दीला उतरती कळा लागली. पुढील 7 कसोटी सामन्यात त्यांनी केवळ 12 विकेट्स घेतल्या होत्या.
-हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राजू यांनी नेपाळ आणि युएईसारख्या सहयोगी देशांसोबतही फिरकी गोलंदाजी सल्लागार म्हणून काम केले आहे.