मराठीत माहिती- क्रिकेटर फारुख इंजीनिअर

संपुर्ण नाव- फारुख मानेक्षा इंजीनिअर

जन्मतारिख- 25 फेब्रुवारी, 1938

जन्मस्थळ- बॉम्बे ( आता- मुंबई ), महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत, लॅन्कशायर आणि मुंबई

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- लेगब्रेक गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर, 1961

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 46, धावा- 2611, शतके- 2

आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 5, धावा- 114, शतके- 0

थोडक्यात माहिती- 

– इंजीनिअर हे पॉली उम्रीगर, नारी कॉन्ट्रॅक्टर आणि रुसी सुर्ती यांच्यानंतर भारतीय संघाकडून क्रिकेट खेळलेले शेवटचे पारसी क्रिकेटपटू आहेत.

-मुंबई पोदार कॉलेजमधून स्टार क्रिकेटपटू बनणारा इंजीनिअर हे पहिलेच विद्यार्थी होता. त्याच्यानंतर दिलीप वेंगसकर, संजय मांजरेकर आणि रवी शास्त्री हेदेखील याच कॉलेजचे विद्यार्थी भारताकडून क्रिकेट खेळले.

– इंग्लंड दौऱ्यावर असताना इंजीनिअर यांना नवे टोपणनाव देण्यात आले होते. इंग्लंडचा क्रिकेटपटू  लेजेन्ड फ्रेड ट्रूमनने त्याला फारुख या नावावरुन ‘रूकी’ (Rooky) असे टोपणनाव दिले होते.

-इंजीनिअर हे 1965मध्ये वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू होते. 1973मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘पद्मश्री’ देण्यात आला होता. याचबरोबर क्रिकेट क्षेत्रातील योगदानामुळे बीसीसीआयने 2013 साली त्याला ‘बापू नाडकर्णी’ आणि ‘एकनाथ सोलकर’ (मरणोत्तर) पुरस्काराने गौरवले होते.

You might also like