संपुर्ण नाव- वॉशिंग्टन सुंदर
जन्मतारिख- 5 ऑक्टोबर, 1999
जन्मस्थळ- चेन्नई, तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, भारत अ, भारत क, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, जोन्स टीयुटीआय पॅट्रिओट्स, मद्रास रबर फॅक्टरी, राइजिंग पुणे सुपजायंट्स आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, तारिख – 15 जानेवारी, 2021, ठिकाण – ब्रिसबेन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 13 डिसेंबर, 2017, ठिकाण – मोहाली
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 24 डिसेंबर, 2017, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने – 4, धावा – 265, सर्वोत्तम कामगिरी – 96*
गोलंदाजी– सामने -4, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी – 3/89
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/30
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 26, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 31, विकेट्स- 25, सर्वोत्तम कामगिरी- 3/22
थोडक्यात माहिती-
-वॉश्गिंटन सुंदरने वयाच्या 11व्या वर्षी द्वितीय विभाग लीगमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
-13 वर्षीय संघातून विद्यालयीन क्रिकेट खेळत असताना सुंदरने यष्टीरक्षक फलंदाजीने सुरुवात केली होती. पण, संघाला त्याच्यापेक्षा गुणवान यष्टीरक्षक फलंदाज भेटल्याने सुंदर फिरकी गोलंदाजीकडे वळला.
-सुंदरच्या फिरकी गोलंदाजीने सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला बाद केले होते. त्यामुळे त्याला आयपीएलच्या राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाबरोबर सराव करण्याची संधी मिळाली होता. शिवाय तो डेथ षटकातही चांगली फलंदाजी करण्याचे सामर्थ्य राखतो.
-वयाच्या 13व्या वर्षी आपल्या गोलंदाजी शैलीने सुंदरने प्रशिक्षक एम सेंथिलनाथन यांना प्रभावित केले होते. यामुळे त्याला लवकरच प्रथम विभाग क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. तिथून तो रणजी ट्रॉफीच्या तमिळनाडू संघाकडे वळला.
-सुंदरला क्रिकेट क्षेत्रात तेव्हा ओळख मिळाली, जेव्हा त्याला 2014मध्ये 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळण्यास निवडण्यात आले. त्यावेळी तो अवघ्या 15 वर्षांचा होता.
-त्यानंतर 2 वर्षांनी आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक संघात महत्त्वाची भूमिका बजावत त्याने संघाला अंतिम सामन्यात नेले होते.
-6 ऑक्टोबर 2016मध्ये सुंदरनेतमिळनाडू संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते. जरी त्याला पहिल्या सामन्यात गोलंदाजी करायला मिळाली नसली, तरी त्याने फलंदाजी करत 40 धावा केल्या होत्या.
-2016मध्ये तमिळनाडू प्रिमीयर लीगच्या पहिल्या हंगामात सुंदर अल्बर्ट टीयुटीआय संघाकडून खेळला होता. यावेळी लीगमध्ये 9 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याचे इकोनॉमी रेट हे 5.54 इतके होते.
-2017मध्ये तमिळनाडू संघाच्या विजय हजारे आणि देवधर ट्रॉफीतील विजयात सुंदरचा महत्त्वाचा वाटा होता. त्यावेळी त्याचे इकोनॉमी रेट हे 3.93 इतके होते.
-आयपीएलच्या आरपीएस संघाच्या सरावावेळी सुंदरला भारतीय संघातील क्रिकेटपटू आणि जम्मू कश्मिर संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेज रसूल यांच्यासोबत खेळायला मिळाले. परवेज आणि सुंदर तेवढ्याच टक्करीचे खेळाडू आहेत. फक्त सुंदरला परवेजपेक्षा थोडा कमी अनुभव आहे.
-2017मध्ये आरपीएसच्या रविचंद्रन अश्विनला दुखापत झाल्याने सुंदरला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. यावेळी त्याने 11 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या.
-सुंदरने डिसेंबर 2017 मध्ये श्रीलंकाविरुद्ध वनडे आणि टी20त पदार्पण केले होते. त्याने 4 वनडेत 5 विकेट्स आणि 31 आंतरराष्ट्रीय टी20त 25 विकेट्स घेतल्या आहेत.
-यावर्षी सुंदरला इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने 4 कसोटी सामने खेळले असून आतापर्यंत त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माचा शर्मनाक रेकॉर्ड, भल्याभल्यांना मागे टाकत ‘या’ लाजीरवाण्या यादीत भाऊ पहिल्या स्थानी
भारतीय गोलंदाजांची पुन्हा धुलाई! रुसोच्या तुफानी शतकाने दक्षिण आफ्रिका 3 बाद 227