संपुर्ण नाव- योगराज सिंग भागसिंग भूंदेल
जन्मतारिख- 25 मार्च, 1958
जन्मस्थळ- चंदिगड
मुख्य संघ- भारत, पंजाब आणि हरियाणा
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे मध्येमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 ते 25 फेब्रुवारी, 1981, ठिकाण – वेलिंग्टन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 डिसेंबर, 1980, ठिकाण – ब्रिस्बेन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 10, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 6 धावा
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/63
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 1, शतके- 0, सर्वोत्तम कामगिरी – 1 धावा
गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/44
थोडक्यात माहिती-
-भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे वडील म्हणजेच योगराज सिंग.
-उंच वेगवान गोलंदाज योगराज यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1 कसोटी आणि 6 वनडे सामने खेळले होते. विशेष म्हणजे यातील सर्व सामने त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध खेळले होते आणि यावेळी अवघ्या 5 विकेट्स घेतल्या होत्या.
-योगराज यांनी देशांतर्गत स्तरावर 30 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. सात त्यांनी 27च्या सरासरीने 66 विकेट्स घेतल्या होत्या.
-योगराज यांना क्रिकेटपेक्षा जास्त रूची चित्रपट क्षेत्रात होती. परिणामत: त्यांनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-योगराज यांनी बॉलिवूड, हॉलिवूड आणि पॉलिवूड (पोश्तो सिनेमा) सिनेसृष्टीत मिळून 100हून अधिक सिनेमात काम केले आहे.
-त्यांना फिल्मफेअर आणि पीटीसीतर्फे 21वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
-त्यांनी लव्ह पंजाब, टशन, कच्चे धागे, छन्ना मेरेया, जट पंजाब दा अशा अनेक पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
-वयाच्या 60व्या वर्षी लोक निवृत्त होऊन आराम करण्याचा विचार करतात. मात्र, या काळात योगराज हे त्यांच्या साजन सिंग रंगरूत या चित्रपटाच्या कामात व्यस्त होते.
-त्यांनी भाग मिल्खा भाग आणि सिंग इज ब्लिंग या बॉलिवूड सिनेमातही काम केले आहे.
-एवढेच नव्हे तर, योगराज यांनी हॉलिवूड सिनेमा वेस्ट इज वेस्टमध्ये सीमा अधिकाऱ्याचा रोल केला आहे. हा सिनेमा 2010मध्ये प्रद्रशित झाला होता. शिवाय हा सिनेमा 1999मधील ब्रिटिश नाटक इस्ट इज इस्ट याची प्रेरणा घेऊन बनवण्यात आला होता.