संपुर्ण नाव- यूसुफ खान पठाण
जन्मतारिख- 17 नोव्हेंबर, 1982
जन्मस्थळ- बडोदा, गुजरात
मुख्य संघ- भारत, बडोदा, भारत अ, इंडिया ग्रीन, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 10 जून, 2008, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 24 सप्टेंबर, 2007, ठिकाण – जोहान्सबर्ग
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 57, धावा- 810, शतके- 2
गोलंदाजी- सामने- 57, विकेट्स- 33, सर्वोत्तम कामगिरी- 3/49
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 22, धावा- 236, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 22, विकेट्स- 13, सर्वोत्तम कामगिरी- 2/22
थोडक्यात माहिती-
-यूसुफ पठाण याचे वडील मेहमूद खान पठान हे मशीदमध्ये काम करत असत. त्याच्या वडीलांची इच्छा होती की, यूसुफ आणि त्याचा भाऊ इरफान पठान यांनीही तेच काम करावे. पण दोघांनाही क्रिकेटमध्ये जास्त रस होता.
-यूसुफ भारताचे माजी कर्णधार दत्ता गायकवाड यांच्या हातून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होता. दररोज 6 तास तो मेहनत करत असे. 2001-02मध्ये त्याला प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
-यूसुफचा लहान भाऊ इरफान हा देखील भारतीय संघाकडून खेळला आहे.
-2007सालच्या देवधर ट्रॉफीतील प्रदर्शनाने युसुफला टी20 विश्वचषक 2007मधील अंतिम सामन्यातून टी20त पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने 15 धावा केल्या होत्या.
-तर, 10 जून 2008मध्ये ढाका येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून यूसुफने वनडेत पदार्पण केले. त्याला कसोटीत खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.
-2009च्या श्रीलंकाविरुद्धच्या टी20 सामन्यात पठान बंधूंनी मिळून हातून गमवता सामना सावरला होता. भारत श्रीलंकाच्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 7 बाद 115वरती होता. पुढे यूसुफ आणि इरफानने 25 चेंडूत 59 धावांची भागीदारी करत 4 चेंडू राखून सामना जिंकला होता.
-यूसुफ आयपीएलच्या पहिल्या हंगामात खूप फॉर्ममध्ये होता. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकले होते. 4 वर्षे आयपीेलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. पण 30 चेंडूत शतक मारत ख्रिस गेलने त्याचा हा विक्रम मोडला होता.
-2014मध्येही यूसुफने आयपीएलमध्ये उत्कृष्ट खेळी केली होती. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना सनराइजर्स हैद्राबादविरुद्ध त्याने 22 चेंडूत 72 धावा केल्या होत्या. त्यावर्षी केकेआरने आयपीएल जिंकले होते. शिवाय 15 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
-15 मे 2013मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना क्षेत्ररक्षणात अडथळा आणणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्यामुळे सामन्यातून निलंबीत करण्यात आले होते.
-रणजी ट्रॉफीत 18 चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम 2015पर्यंत यूसुफच्या नावावर होता. 2015मध्ये बनदीप सिंग यांनी 15 चेंडूत अर्धशतक करत हा विक्रम आपल्या नावावर केला.
-बडोदा आणि जम्मू काश्मिरमध्ये रणजी ट्रॉफी सामना चालू असताना एका चाहत्याने नकोसे कमेंट्स केल्याने यूसुफने त्याला चापट मारली होती. 2014 सालच्या या सामन्यात त्याच्या या वागण्यामुळे त्याला निलंबीत करण्यात आले.
-2011च्या विश्वचषकापुर्वी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एमटीएन वनडे मालिकेत 70 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकार मारत यूसुफने 105 धावा केल्या होत्या. यासह तो भारतीय उपखंडाच्या बाहेर सर्वात जलद शतक करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.
-2010च्या दुलीप ट्रॉफीत पश्चिम विभागाकडून पहिल्या डावात 108 आणि दुसऱ्या डावात 210 धावा केल्या होत्या. तसेच उत्तर विभागाच्या 3 खेळांडूंना बाद करत सामना जिंकला होता. त्यामुळे प्रथम श्रेणी इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झाला होता.
-27 मार्च 2013मध्ये यूसुफने फिजिओथेरपिस्ट आफरिनशी लग्न केले. त्यांना 2 मुले आहेत.
-युसुफ आणि इरफानने मिळून बडोदा येथे पठाण क्रिकेट अकॅडमीचीही स्थापना केली आहे. शिवाय त्यांनी ग्रेग चॅपेलशी करार केला आहे. ते अकॅमडमीचे मार्गदर्शक आहेत.