संपुर्ण नाव- युजवेंद्र सिंग चहल
जन्मतारिख- 23 जुलै, 1990
जन्मस्थळ- जींद, हरियाणा
मुख्य संघ- भारत, हरियाणा, भारत अ, मुंबई इंडियन्स, उत्तर विभाग आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 11 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 18 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 52, धावा- 49, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 52, विकेट्स- 91, सर्वोत्तम कामगिरी- 6/42
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 42, धावा- 5, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 42, विकेट्स- 55, सर्वोत्तम कामगिरी- 6/25
थोडक्यात माहिती-
-युजवेंद्र चहलला लहानपणीपासूनच क्रिकेट आणि बुद्धिबळची आवड होती. त्याने प्रथम बुद्धिबळद्वारे क्रिडा क्षेत्रात पाऊल ठेवले होते. वयाच्या 7व्या वर्षीपासून त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती.
-चहलने वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत. 2002मध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चहलने 12 वर्षांखालील विजेतेपद पटकावले होते. तर, पुढील वर्षी आशियाई युवा चॅम्पियनशिपमध्ये तो टॉप 20 बुद्धिबळपटूमध्ये होता. तसेच तो ग्रीसमधील विश्व युवा चॅम्पियनशिपमध्ये 16 वर्षांखालील भारतीय बुद्धिबळपटू म्हणून खेळला आहे.
-चहलचे नाव एफआयडीइच्या अधिकृत साईट यादीत आहे. त्याचे तेथील गुण 1946 इतके आहेत.
-2009मध्ये चहलने राष्ट्रीय 19 वर्षांखालील बिहार ट्रॉफीत 34 विकेट्स घेतल्या होत्या. यासह तो संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून नावलौकिक झाला. त्याचवर्षी त्याने हरियाणाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले.
-2010मध्ये मुंबई इंडियन्सने चहलला 10 लाख रुपयांना विकत घेतले होते. यावेळी त्याने अंतिम सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजीने 3-0-9-2 अशी आकडेवारी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर पुढे 2 वर्षात त्याला अवघा 1 सामना खेळायला मिळाला होता.
-2014मध्ये चहलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10 लाख रुपयांना विकत घेतले होते. आयपीएलच्या 9व्या हंगामात चहलने 11 सामन्यात 17.05च्या सरासरीने 19 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला.
-दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार केविन पीटरसनची विकेट ही आपली सर्वात अनमोल विकेट आहे, असे चहल मानते.
-बुद्धिबळ आणि क्रिकेटव्यतिरिक्त चहलला फुटबॉलमध्येही रुची आहे. तो त्याचे आवडते फुटबॉलपटू रिअल मॅड्रिड आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांना नेहमी समर्थन देत असतो.