संपूर्ण नाव- झहीर खान
जन्मतारिख- 7 ऑक्टोबर, 1978
जन्मस्थळ- श्रीरामपूर, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, बडोदा, दिल्ली देअरडेविल्स, मुंबई, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सुरी आणि वोरसेस्टरशायर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध बांगलादेश, तारिख – 10 ते 13 नोव्हेंबर, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 3 ऑक्टोबर, 2000
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 92, धावा- 1231, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 92, विकेट्स- 311, सर्वोत्तम कामगिरी- 7/87
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 200, धावा- 792, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 200, विकेट्स- 282, सर्वोत्तम कामगिरी- 5/42
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 17, धावा- 13, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 17, विकेट्स- 17, सर्वोत्तम कामगिरी- 4/19
थोडक्यात माहिती-
-झहीर खान याचा जन्म श्रीरामपूर या छोट्याश्या शहरात झाला, जे शिरडीपासून 40 किमी दूर आहे.
-त्याचे वडील बख्तियार खान हे फोटोग्राफर होते. तर आई झाकिया या शिक्षिका होत्या. झहीरला झीशन हा मोठा भाऊ आणि अनिस हा लहान भाऊ आहे.
-झहीरने शालेय शिक्षणानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स केला. पण, त्याचे प्रशिक्षक भारताचे माजी क्रिकेटपटू सुधीर नाईक यांनी त्याला क्रिकेवरती जास्त लक्ष देण्यास सांगितल्याने त्याने इंजिनिअरिंग सोडले.
-23 नोव्हेंबर 2017साली झहीरचे बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी लग्न झाले.
-झहीरमधील क्रिकेट कौशल्याला पाहता त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या 17व्या वर्षी मुंबईच्या राष्ट्रीय क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले होते. यावेळी त्याने शिवाजी पार्क जिमखाना विरुद्धच्या अंतिम सामन्यात 7 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-झहीरला त्याच्या सुरुवातीच्या काळात विमामाने प्रवास करण्याची भीती वाटत होती. याबाबतीत त्याने त्याचे रणजी ट्रॉफी प्रशिक्षक विद्याधर प्रभाकर यांना सांगितले होते. तेव्हा त्याला मुंबईहून मध्य प्रदेशला विमामाने प्रवास करायचा होता.
-क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरचा झहीर चाहता आहे. तर टोनिसपटू रॉगर फेडररही त्याचे प्रेरणास्थान आहेत.
-त्याच्या या कामगिरीने त्याला 1998-99 साली मुंबई आणि पश्चिम विभागाकडून 19 वर्षांखालील क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली होती.
-1999-2000 साली झहीरने बडोदा संघाकडून त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच तो प्रथम श्रेणीतील तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज होता. तर, आशिश झैदी आणि सदागोप्पन महेश यांच्यानंतर तो प्रथम श्रेणीतील सर्वोत्कृष्ट डाव्या हाताचा गोलंदाज होता.
– रेल्वेजविरुद्धच्या 2000-01सालच्या रणजी ट्रॉफी हंगामात झहीरने 8 विकेट्स घेत आपल्या बडोदा संघाला 21 धावांनी चषक जिंकून दिले होते. त्यामुळे त्याला सलामीवीर पुरस्कारही मिलाला होता.
-2000साली त्याची नैरोबी येथील आयसीसी नॉक आउट ट्रॉफीत निवड झाली होती. त्यानंतर त्याला वनडेत पदार्पण करण्याची संधी मिळाली
-केन्याविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणारा झहीर याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा दुसरा वनडे सामना खेळला होता. हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्यपुर्व वनडे सामना होता. यात झहीरने 2 महत्वाच्या विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला होता.
-त्याकाळात जगवाल श्रीनाथ आणि आशिष नेहरा यांच्यासह झहीर खानलाही 2003 आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. भारताने हे विश्वचषक मोठ्या फरकाने गमावले होते. मात्र, संपूर्ण विश्वचषकातील 11 सामन्यात 20.77च्या सरासरीने 18 विकेट्स घेत झहीर सर्वाधिक विकेट्स घेणारे चौथे फलंदाज ठरले होते.
-2006 साली झहीरने वोरसेस्टरशायर संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच 10 विकेट्स घेत झहीरने नवा इतिहास रचला होता. तो वोरसेस्टरशायरच्या 100वर्षाच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातच एवढ्या विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.
-वोरसेस्टशायरमधील त्याच्या कामगिरीने त्याला झिपी झॅकी असे टोपणनाव पडले.
-त्यानंतर त्याने 2007 सालच्या इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत झहीरला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता. त्याने संपूर्ण कसोटी मालिकेत 18 विकेट्स घेतल्या होत्या.
-2008-2012च्या काळात त्याला दुखापतीमुळे जास्त सामने खेळता आले नव्हते. तरीही त्याने 2010 साली बांग्लादेशविरुद्धच्या कसोटीत 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-2011 साली झहीरला दुसऱ्यांदा आयसीसी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी संपूर्ण विश्वचषकात 18.76च्या सरासरीने 21 विकेट्स घेत तो पाकिस्तानच्या शाहिद अफ्रिदीसह विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
-2013साली दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसची विकेट घेत झहीर हा कसोटीत 300 विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.
-झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीम स्मिथची सर्वाधिक 14 वेळा विकेट घेतली होती.
-झहीरने आयपीएलच्या तीन वेगवेगळ्या संघाकडून क्रिकेट खेळले आहे. तो पुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आता तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएव खेळतो.
-झहीरने गोलंदाजी व्यतिरिक्त फलंदाजीतही विक्रम केले आहेत. 2004 साली बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत 11व्या क्रमांकावर फलंदाजी करत झहीरने 75 धावा केल्या होत्या. यासह 11व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर झहीर 2017 साली भारतीय संघाचा गोलंदाजी सल्लागार होता.
-झहीरला त्याच्या क्रिकेटमधील योगदानामुळे 2008 सालचा विझडन क्रिकेटपटू पुरस्कार मिळाला होता.
-2014मध्ये झहीरने मुंबईमध्ये प्रोस्पोर्ट फिटनेस आणि सर्विसची स्थापना केली. यामध्ये क्रिकेट फिजिओथेरपिस्ट अॅड्रियन ले रोक्स आणि अँड्र्यू लेपस हे फिटनेसचे प्रशिक्षण देतात.
-तसेच पुणे येथे झहीरचे झेडके हे उपहारगृह आहे. ज्याचे व्यवस्थापन त्याचा लहान भाऊ अनिस करतो.
हेही वाचा-
विश्वचषक 2003मध्ये 7 षटकात 67 धावा ते 2011ला 3 मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा 45वा बड्डे, खास गोष्टी वाचा
सागरिकाबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल 7 वर्षे होते प्रेमसंबंध!
गोष्ट एका क्रिकेटरची: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान