---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर भुवनेश्वर कुमार

On: बुधवार, जून 3, 2020 10:08 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- भुवनेश्वर कुमार सिंग

जन्मतारिख- 5 फेब्रुवारी, 1990

जन्मस्थळ- मेरठ, उत्तर प्रदेश

मुख्य संघ- भारत, ऑस्ट्रेलियन इन्सटिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, मध्य विभाग, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया रेड, इंडिया टोबॅको कंपनी, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनराईजर्स हैद्राबाद, उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन एकादश

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 22 ते 26 फेब्रुवारी, 2013, ठिकाण – चेन्नई

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 30 डिसेंबर, 2012, ठिकाण – चेन्नई

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 25 डिसेंबर, 2012, ठिकाण – बेंगलोर

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 21, धावा- 552, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 21, विकेट्स- 63, सर्वोत्तम कामगिरी- 6/82

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 114, धावा- 526, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 114, विकेट्स- 132, सर्वोत्तम कामगिरी- 5/41

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 43, धावा- 23, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 43, विकेट्स- 41, सर्वोत्तम कामगिरी- 5/24

थोडक्यात माहिती-

-भुवनेश्वर कुमार हा उत्तर प्रदेश पोलिस स्टेशनमधील सब-इनस्पेक्टर किरण पाल सिंग यांचा मुलगा आहे.

-भुनेश्वरला भारतीय संघात भुवी या नावाने बोलावले जाते.

-भुवीला आर्मी ऑफिसर बनायचे होते.त्याचे लहानपणीपासूनचे हे स्वप्न होते. पण तसे झाले नाही.

-राहूल द्रविडनंतर भारतीय संघातील सभ्य खेळाडू म्हणून भुवीकडे पाहिले जाते. तो खूप शांत आणि लाजऱ्या स्वभावाचा आहे.

-जेव्हा भुवीने क्रिकेट क्षेत्राकडे वळायचे ठरवले. तेव्हा त्याला त्याची बहीण रेखा अधाना हिने खूप मदत केली. तिने भुवीला वयाच्या 13व्या वर्षी जवळच्या क्रिकेट प्रशिक्षण कॅम्पमध्ये दाखल केले.

-बराच वर्षे वयोगटातील क्रिकेट खेळल्यानंतर अखेर 2007मध्ये उत्तर प्रेशकडून प्रथम श्रेणीत पदार्पण करण्याची भुवीला संधी मिळाली. त्याने वयाच्या 17व्या वर्षी प्रथम श्रेेणीतील पहिल्याच डावात 25 धावा देत बंगालच्या 3 फलंदाजांना बाद केले होते.

-2008-09च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात 19 वर्षीय भुवीने सचिन तेंडुलकरला शून्य धावेवर बाद केले होते. प्रथमच सचिन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला होता.

-2012च्या दुसऱ्या दुलिप ट्रॉफी उपांत्य फेरित भुविने फलंदाजी केली होती. तो सामना होता मध्य विभाग विरुद्ध उत्तर विभाग. यावेळी 8व्या क्रमांकावर फलंदाजी करत भुवीने 253 चेंडूत 128 धावा केल्या होत्या. या त्याच्या प्रथम श्रेणीतील सर्वाधिक धावा होत्या.

-डिसेंबर 2012ला पाकिस्तानविरुद्धच्या टी20सामन्यातून भुवीने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. यावेळी पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुवीने नासिर जमशदला बाद केले होते. तर दुसऱ्या षटकात उमर अकमल आणि मोहम्मद हाफिजची विकेट घेतली होती. अशाप्रकारे 4 षटके गोलंदाजी करत त्याने 3/9 अशी कामगिरी केली होती.

-डिसेंबर 2012च्या पाकिस्तान दौऱ्यावर त्याने वनडे पदार्पणही केले होते. यावेळी पहिल्याच चेंडूवर भुवीने मोहम्मद हाफिजची पहिली विकेट घेतली होती. यावेळी 9 षटके गोलंदाजी करत त्याने 2/27 अशी कामगिरी केली. भारताने तो सामना 6 विकेट्सने गमावला.

-चेन्नईतील 2013सालच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून भुवी पहिल्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये उतरला होता. यावेळी 9व्या विकेटसाठी भुवीने एमएस धोनीने 140 धावांची भागिदारी रचली होती. यावेळी 10व्या क्रमांकावर फलंदाजी करत भुविने 38 धावा केल्या होत्या. ह्या 10व्या क्रमांकावर कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी पदार्पणात केलेल्या सर्वाधिक धावा होत्या.

-भुविने त्याची वनडेतील सर्वोत्कृष्ठ आकडेवारी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिरंदी मालिकेत नोंदवली होती. यावेळी उपांत्य फेरित श्रीलंकाविरुद्ध त्याने 6 षटके गोलंदाजी करत 8 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या होत्या.

-2014साली इंग्लंडविरुद्ध भुवीने पहिल्या कसोटीतील 2 डावात 58 आणि नाबाद 63 धावा केल्या होत्या. तर, तर ददुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात 52 धावा केल्या होत्या. यासह एका कसोटी मालिकेत 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत 3 अर्शतके नोंदवणारा तो पहिला भारतीय ठरला.

-भुवीला गेमिंग खूप आवडते. तो मोकळ्या वेळेत गेम खेळत असतो. प्लेस्टेशन ही त्याची सर्वात आवडती गेम आहे.

-भुवी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात पहिल्या षटकात पहिली विकेट मिळवणारा एकमेव गोलंदाज आहे. त्याने टी20त पहिल्या षटकात नासिर मोहम्मद(पाकिस्तान), वनडेत पहिल्या चेंडूवर मोहम्मद हाफिज (पाकिस्तान) आणि कसोटीत पहिल्या षटकात डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) यांच्या विकेट घेतल्या होत्या.

-2014मध्ये भुवीला एलजी पिपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---