---Advertisement---

भारत दौऱ्यासाठी ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात सामील…

On: रविवार, मार्च 8, 2020 5:45 PM
---Advertisement---

जोहान्सबर्ग । 12 मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात 3 सामन्यांची वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज जानेमन मालानला (Janneman Malan) शनिवारी (7 मार्च) भारतीय दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघात सामील केले आहे.

दक्षिण आफ्रिका संघ रविवारी (8 मार्च) भारतीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यावेळी मालान हा दक्षिण आफ्रिकेच्या 16 जणांच्या संघाचा भाग असणार आहे. याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितले की, “सलामीवीर फलंदाज मालानला भारताविरुद्ध वनडे दौऱ्यासाठी संघात सामील केले आहे.”

या मालिकेतील पहिला सामना 12 मार्चला धरमशाला येथे होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामना 15 आणि 18 मार्चला होणार आहे.

23 वर्षीय मालानने फेब्रुवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने बुधवारी (4 मार्च) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने नाबाद 129 धावांची शतकी खेळी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेला सामनाही जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला टी२० विश्वचषक फायनल: एलिसा हिलीचे शानदार अर्धशतक

अखेर १२ व्या षटकात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिला पहिला धक्का

टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी हे ५ टप्पे ठरले महत्त्वाचे!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---