नवी दिल्ली। दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहिर बळी घेतल्यानंतर खास पद्धतीने आनंद साजरा करण्यासाठी ओळखला जातो. या 41 वर्षीय खेळाडूमध्ये खूप ऊर्जा आहे. बळी घेतल्यानंतर तो मैदानावर धावून आनंद साजरा करतो, परंतु यावेळी त्याने झेल घेऊन वेगळ्या प्रकारे आनंद साजरा केला आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
इम्रान ताहिर सध्या पाकिस्तान सुपर लीग 2020 मध्ये खेळण्यात व्यस्त आहे. कराची किंग्जविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात त्याने महत्वाचा फलंदाज रुदरफोर्डला बाद केले. यासह त्याने त्याच्या चार षटकांच्या गोलंदाजीत केवळ 22 धावा दिल्या. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट 5.50 होता. या सामन्यादरम्यान इम्रानने एक झेल घेतला आणि नवीन पद्धतीने आनंद साजरा केला.
प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान्स या संघाने 141 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कराची किंग्ज लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. डावाचे चौथे षटक वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर फेकायला आला. त्यावेळी शारजील खान खेळपट्टीवर फलंदाजी करत होता. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने स्क्वेअर लेगवर फटका मारला आणि इम्रान ताहिरने शानदार झेल घेतला. झेल घेतल्यानंतर त्याने मैदानावर वेगळ्या अंदाजात झोपून आनंद साजरा केला.
https://twitter.com/ihsan_im7/status/1327597405060141056?s=19
Finally Imran Tahir Stop Running 🤣🤣#KKvMS pic.twitter.com/ZUiZsxv9ue
— Mansoor Aziz (@Mansoor56148704) November 14, 2020
Imran tahir everywhere 😂#PSLV #PSL2020 pic.twitter.com/0GQUi1fNoB
— Iqrar Alee Ameer (@IqrarAlee112) November 14, 2020
Here is one for the latest meme library #Imrantahir #KKvMS #PSLV pic.twitter.com/s3zCOMZBrc
— 🇺🇸 Shah (@syedwaqasmunir) November 14, 2020
https://twitter.com/AdamDhoni1/status/1328310794321154050?s=19
Like a King – Imran Tahir. Taking a brilliant running catch followed by this celebration. pic.twitter.com/Hn8kEAuyFB
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2020
Sohail Tanvir removes Sharjeel Khan cheaply and Imran Tahir takes an excellent catch
Karachi Kings are 23/1 in the fourth over#HBLPSLV #PhirSeTayyarHain #MSvKK pic.twitter.com/R4hpp7yUtN
— Cricingif (@_cricingif) November 14, 2020
मात्र, हा सामना इम्रान ताहिर आणि मुलतान सुलतान्ससाठी खास ठरला नाही. सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला आणि अखेर मुलतान सुलतान्सच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. रवी बोपाराने 40 धावांची खेळी केल्यामुळे मुलतान संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 141 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल कराची किंग्जचा कर्णधार बाबर आझमने 65 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी करत 20 षटकांत 8 बाद 141 धावा केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये कराची किंग्जकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने 14 धावांचा बचाव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची जर्सी आणि मास्क घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला गेला हा खेळाडू; संघ झाला ट्रोल
फक्त तू आणि मी! वेस्ट इंडिजच्या खेळाडूने हटके अंदाजात केला साखरपुडा
चर्चा तर होणारंच! विराट कोहलीला ट्रोल करणारं ट्वीट सूर्यकुमार यादवकडून लाईक
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…