वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी (१७ नोव्हेंबर) हटके अंदाजात साखरपुडा केला. पूरनचे त्याची मैत्रीण कॅथरीन मिगुएलशी असलेल्या दीर्घ प्रेमसंबंधानंतर साखरपुडा केला आहे. पूरनने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून आपल्या कॅथरीनला प्रपोज करणारे आणि गुडघ्यावर बसून अंगठी घातल्याचे फोटो शेअर केले आहेत.
निकोलस पूरनने कॅथरीन मिगुएलबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले, “देवाने आम्हाला एक मोठा आशीर्वाद दिला आहे. मी आणि कॅथरीन मिगुएल आम्ही साखरपुडा झाल्याची घोषणा केल्याचा मला आनंद होत आहे. लव्ह यू मिग, तू मला मिळालीस.”
निकोलस पूरननंतर कॅथरीन मिगुलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटोही शेअर केले आहेत. तिने लिहिले की, “यावेळी त्याने सर्व काही सुंदर केले आहे. तुझे माझ्यावर प्रेम करणे हे वरदान आहे. ज्यासाठी मी दररोज देवाचे आभार मानते. लव्ह यू निकोलस पूरन.”
निकोलस आणि कॅथरीन नुकतेच इंडियन प्रीमियर लीग 2020 साठी युएईमध्ये होते. आयपीएलच्या वेळी कॅथरीन अनेकदा निकोलसला चिअर्स करताना स्टँडमध्ये दिसली होती. आयपीएलमध्ये निकोलस किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसला.
त्याचवेळी निकोलस पूरन आता वेस्ट इंडिज संघासह टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये गेला आहे. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाईल, जेथे तो त्याच्या कारकिर्दीत बिग बॅश लीग स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
मोठ्ठा गेम झाला यार! पूरनमुळे धाव चोरण्याचा सावळा गोंधळ अन् मयंक थेट तंबूत दाखल
अविश्वसनीय! पूरनचे क्षेत्ररक्षण पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
ट्रेंडिंग लेख-
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…