---Advertisement---

चक्क झेल घेण्यासाठी यष्टीरक्षकाने धरले फलंदाजाचे पाय! पहा व्हिडिओ…

On: बुधवार, मार्च 11, 2020 6:01 PM
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) 5वा हंगाम विविध विषयांमुळे चर्चेत राहिला आहे. यात पाकिस्तानी यष्टीरक्षक उमर अकमलवर घालण्यात आलेली बंदी, तसेच पाकिस्तानी गोलंदाज इमरान ताहिर आणि न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरो यांच्यात मैदानावर झालेला वाद यांचा समावेश आहे.

मात्र, यावेळी पीएसएलमधील एक गमतीशीर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत फलंदाजाचा झेल पकडण्यासाठी यष्टीरक्षक त्याचे पाय पकडत असल्याचे दिसत आहे.

झाले असे की, रविवारी (8 मार्च) गद्दाफी स्टेडियम येथे पीएसएल स्पर्धेतील 23 वा सामना लाहोर कलंदर्स विरुद्ध कराची किंग्स संघात पार पडला. हा सामना लाहोर संघाने 8 गडी राखून जिंकला. यावेळी कराची संघातील यष्टीरक्षक चॅडविक वॉल्टन (Chadwick Walton) हा लाहोर संघातील फलंदाज बेन डंकचा (Ben Dunk) झेल घेण्याचा प्रयत्न करताना त्याचे पाय पकडताना दिसून आला.

डंकने फलंदाजी करत असताना 10व्या षटकात गोलंदाज कॅमरन डेलपोर्टच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटला लागून डंकला येऊन धडकला आणि त्याच्या गळ्यापाशी लागून खाली पडला.  तेवढ्यात वॉल्टनने झेल पकडण्याचा प्रयत्नात डंकच्या पायांना मिठी मारली.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना कराची संघाने निर्धारित षटकात 5 बाद 187 धावा केल्या होत्या. तसेच लाहोर संघाला 188 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डंकने 3 चौकार आणि 12 षटकार मारत नाबाद सर्वाधिक 99 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यास साहाय्य केले. शिवाय लाहोर संघाचा कर्णधार सोहेल अख्तरने 68 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

पुजाराच्या वडिलांकडून फलंदाजी शिकणारा ‘हा’ खेळाडू रणजी फायनलमध्ये चमकला

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

कोरोना व्हायरसमुळे आरसीबीसह आयपीएलला बसणार मोठा धक्का!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---