क्रिकेटमध्ये मैदानावर खेळाडू अनेकदा त्यांच्या कामगिरीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. यावेळी त्यांच्या हावभावांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. मात्र, कधीकधी खेळाडूंचे वागणे प्रेक्षकांनाही आवडत नाही. इतकेच नाही, तर समालोचकही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येतात. अनेकदा समालोचकांकडून असे काही भाष्य केले जाते, जे अनेकांच्या गळ्याखाली उतरत नाही. आताही असेच काहीसे घडले आहे, ज्यामुळे समालोचन करणाऱ्या न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला ट्रोल व्हावे लागले आहे.
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूल (Simon Doull) यांनी नुकतेच पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. खरं तर, पीएसएलमध्ये समालोचन करताना सायमन डूल (Simon Doull) यांनी म्हटले होते की, “संघाला कशाची गरज आहे, यापेक्षा बाबर त्याच्या विक्रमावर जास्त लक्ष देतो.” यानंतर आता त्यांनी पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली याची पत्नी सामिया आरजू (Hasan Ali Wife Samiya Arzoo) हिच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
सायमन डूल काय म्हणाले?
या वक्तव्यानंतर त्यांनी इस्लामाबाद युनायटेड आणि मुल्तान सुल्तान्स संघातील पीएसएल सामन्यात समालोचन करताना हसन अली (Hasan Ali) याच्या पत्नीविषयीही भाष्य केले. खरं तर, इस्लामाबाद संघाने मुल्तानवर शानदार विजय मिळवला. यावेळी डूल समालोचन करत होते. इस्लामाबादच्या विजयानंतर हसन अलीची पत्नी सामिया आरजू (Samiya Arzoo) हीदेखील भलतीच आनंदी दिसली. कॅमेरा तिच्याकडे वळला आणि ती आनंदाने उड्या मारू लागली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सामियाच्या या जल्लोषावर लाईव्ह टीव्हीवर समालोचन करत असलेल्या डूल यांनी म्हटले की, “ती जिंकली आहे. मला विश्वास आहे की, तिने अनेक मने जिंकली आहेत. हे शानदार आहे आणि अविश्वसनीय. हा विजयही शानदार आहे.” समालोचनाचा हा क्षण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सामिया हिचा जन्म भारतात झाला असून ती हरियाणाची आहे. तिने 2019 साली दुबई येथे हसन अली याच्यासोबत संसार थाटला होता. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव हेलेना असे आहे.
सामन्याचा आढावा
इस्लामाबाद संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इस्लामाबाद संघाने 2 विकेट्सने विजय साकारला. हसन अली या सामन्यात खेळत नव्हता. मुल्तानसाठी शान मसूद याने 75 आणि टीम डेविड याने 60 धावांची नाबाद खेळी केली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इस्लामाबादकडून कॉलिन मुन्रो याने 40, शादाबने 44 आणि फहीम अश्रफने 51 धावांची खेळी साकारली. (psl 2023 simon doull trolls with comment on hassan ali s wife samiya arzoo see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ख्वाजा-ग्रीनच्या शतकी धमाक्यानंतर शेपटाचा टीम इंडियाला तडाखा, 480 च्या प्रत्युत्तरात टीम इंडिया बिनबाद 36
ख्वाजा-ग्रीनने रचला इतिहास! बनली भारतात ‘हा’ कारनामा करणारी ऑस्ट्रेलियाची तिसरीच जोडी






