---Advertisement---

पीएसएलमध्ये मोठा गोंधळ: चालू सामन्यात पांढरा चेंडू गुलाबी झाला, पाहा VIDEO

On: शुक्रवार, मार्च 27, 2026 8:44 AM
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 च्या 11व्या हंगामातील एका सामन्यात अनोखी घटना घडल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पीएसएलमधील लाहोर येथे झालेल्या सामन्यात चेंडूचा रंग अचानक बदलल्याचे दिसून आले आणि अंपायरांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.

या सामन्यात गतविजेता लाहोर कलंदर्स आणि नवी टीम हैदराबाद किंग्समेन आमनेसामने होते. लाहोर कलंदर्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याची सुरुवात पारंपरिक पांढऱ्या चेंडूने झाली होती. मात्र काही षटकांनंतर अंपायरांच्या लक्षात आले की चेंडूचा रंग बदलत असून तो पिंक छटेकडे झुकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद किंग्समेनच्या मरून रंगाच्या जर्सीमुळे चेंडूवर रंग लागल्याने हा प्रकार घडला असावा. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू सतत जर्सीला किंवा घामामुळे रंगीत कपड्यांना लागल्याने त्याचा रंग बदलल्याचे मानले जात आहे. अंपायरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला आणि सामना पुन्हा सुरू करण्यात आला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. फखर झमानच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने 199 धावा उभ्या केल्या. फखरने 10 चौकारांच्या मदतीने 53 धावांची दमदार खेळी साकारली.लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद किंग्समेनचा संघ 20 षटकांत केवळ 130 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे लाहोर कलंदर्सने हा सामना 69 धावांनी जिंकत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. फखर ज
मानला त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.या घटनेमुळे PSL मधील तांत्रिक आणि व्यवस्थापनाच्या बाबींवर प्रश्न उपस्थित झाले असून चाहत्यांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---